Shiva Chaudhary

Others

3  

Shiva Chaudhary

Others

भूतं बितं

भूतं बितं

8 mins
9.2K


अमावस्येची भयानक रात्र, आकाशात विजांचा गडगडाट मावत नव्हता. पाऊस रुद्रावतार घेऊन बरसत होता. मालनच्या प्रसव वेदना थांबता थांबत नव्हत्या.... दोन चार जणी, सुईणी सोबत अवघडलेल्या मालनला सोडवायसाठी धडपडत होत्या.दोन चार पळसाच्या छपरा खाली आडोसा घेऊन, आपापसात कुजबुजत होत्या.... मालननं काय पाप केलं व्हतं कुणास ठाऊक तेव्हा तिच्या पोटी ही पणवती वाढून राहिलीय ! आज हे पोर जन्माला आलं तर आयुष्यभर वणवण भटकत राहील. आमवशेचा जलम चांगला नसतो बाई..... सुलीनं तोंड सोडलं.आज जर मालन ले काई जालं तर, मी म्हणते त्या लेकराच्या गयाले नक लावून द्यायले पाहिजे. रुकमी नं वरचढ बाण सोडला.आत बायको अवघडलेली, बाहेर बक्कळ पाऊस वर या बायकांचं अज्ञानी भाष्य, सुंदरचा जीव कावला होता. तितक्यात त्याच्या कानी गोड किलकारी आली. बाळाच्या रडण्यानं त्याचा जीव अर्धा भांड्यात पडला. सुईनीनं मालन बेशुद्ध असल्याचं सांगितलं, अधिक रक्तश्रावामुळे तिची ही अवस्था झाली होती.           पावसाची गती थांबली होती, पण रिपरिप सुरुच होती. सुंदरनं बैलगाडीतून मालनला शहरात हलवायचा निर्णय घेतला. बाळाला मालनची मावस बहीण कामिनी कडे सोपवून व मालनला घोंगडाखाली झाकून सुंदर बैलगाडीतून शहराकडे निघाला. कामिनी ही आठ दहा दिवसाची बाळंत, तिच्या पोटी एक कन्या होती. कामिनीनं त्या लहानग्या ला छातीशी लावलं, जणू आपली आईच पाजतेय या आविर्भावात ते नवजात कामिनीच्या छातीशी बिलगलं होतं. बाहेर पावसानं परत जोर धरला होता. कामिनी मालनच्या चिंतेत पडली होती पण तिला बाळाची ही चिंता होतीच. दोघं बाळांना घेऊन ती झोपी गेली. सकाळी पाऊस थांबला होता. अजून सुंदर व मालनचा काही पत्ता नव्हता. गावातल्या बायका मनात येईल तसं वेड वाकडं बोलत होत्या. तितक्यात कुणी तरी सुंदरची बैलजोडी दारात आणून उभी केली. आणि गाडी दरीत कोसळून मोडून पडल्याची वार्ता दिली. कामिनी च्या पायाखालून जमीन नाहीशी झाली, ती गळा काढून रडू लागली. जशी कामिनी शांत होई, तशा गावतल्या बायका सारा दोष त्या लहान बाळालाच देत होत्या. पण कामिनी मात्र अशा बोलणाऱ्या बायकांकडे रागाऊन पहात होती. कामिनीनेच मालनला लहानपणा पासून वागवली होती, आणि सुंदर सारख्या होतकरू तरुणा सोबत लग्न लाऊन दिलं होतं. सुंदरला ही शहरात जाऊन जम बसवायचा होता. पण प्रसूती पर्यत थांबायला सांगून कामिनीनंच त्याला थांबवलं होतं. आज तिला स्वतःच दोषी असल्यासारखं वाटत होतं. तिनं त्या बाळाला खूप मोठं करायचं मनोमन ठरवलं. बाळाला सुर्याचं नावं दिलं रवी मालन व सुंदर चा काही पत्ता लागलाच नाही. रवी दिवसेंदिवस वाढत होता, कामिनी त्याची काळजी चंदा सारखीच घेत होती. चंदा कामिनीची मुलगी..... ते दोघं हळूहळू मोठी होत होती.गावातील बायका माणसं मात्र रविला पणवती म्हणूनच हीनवत असत. सर्वाच्या मते त्यानं आमवश्येला जन्म घेऊन आई-बापाचा जीव घेतलाय.मुलं थोडी मोठी झाली तशी कामिनीने त्यांना शाळेत घातलं. गावाचा आता हळूहळू विकास होऊ लागला होता. पण माणसं मात्र अज्ञानीच होती. पहिल्यादिवशी रवी शाळेला जात असतांना काळी मांजर आडवी गेली, तर गावकरी म्हटले तुझ्या नशिबी शिक्षण ही नाही. गेली पहील्याच दिवशी मांजर आडवी पणवती कुठचा.......!त्याला हे काही कळत नसे पण काहीतरी वावगं बोलताय हे नक्की कळायचं. तो बऱ्याच दा आईला विचारत ही असे पण कामिनी वेळ मारून नेत असे. जस जसा रवी मोठा होत होता तसतसा गावकऱ्यांचा त्रास वाढू लागला म्हणून कामिनीनं काळजावर दगड ठेऊन रवीला होस्टेलात घातलं. रवीचं गावात येणं कायमचं बंद झालं. कामिनीच चंदाला सोबत घेऊन त्याला भेटून येत असे. गावकरी रविला विसरले होते. पण मालनची आठवण झाली म्हणजे चारदोन शिव्या रविला पडतच असत. मालन गावात लहान पणापासून राहिलेली, एका हाकेवर धावणारी पोर, कुणाचं ही काही काम असलं की हसत हसत करायची. आमवश्येनं आणि रवीनं खाल्ली हा गावकऱ्यांचा समज काही जाता जात नव्हता.             वेळ हळूहळू सरकत जवळपास 25 - 30 वर्षाचा काळ निघून गेला.आज गावात शहरातून काही ठेकेदार आले होते,शासनाने गावात जलप्रकल्प आणण्यासाठी यंत्रणा हलवायला सुरवात केली होती,तसं पाहिलं तर त्यात गावकऱ्यांचं काही भलं नव्हतं, सारं पाणी खालल्या अंगाच्या लोकांना भेटणार होतं. आणि उत्पादकांना तिथं पाण्याच्या सहाऱ्यानं कंपन्या काढायच्या होत्या. नेमकी त्या दिवशी अमावश्याच असल्यानं व  अवकाळी ढगांनी  आकाशात थैमान घालतल्यामुळे काशीनं पुन्हा रवीची आठवण काढत याचं ही खापर रवीच्याच डोक्यावर फोडलं. चंदा कधीच सासरी गेली होती. कामिनीला सारं असह्य होत होतं पण ती रवी मुळे गप्प बसली होती रविनेच तिला गप्प बसायला सांगितलं होतं. आणि गावावर काही ही मोठं संकट आलं तर मला कळवं म्हणून सांगितलं होतं. आज ती वेळ आली होती कामिनीनं सारा वृत्तांत रवीला कळवला. गावात आता रविला कामिनी खेरीज कुणीच ओळखत नव्हतं. त्यालाही तेच हवं होतं. गावात पाहणीसाठी निरनिराळे पथकं येऊ लागलित. गावकरी रवीला मन भरून कोसू लागलीत. सरकारी मार्गानं काम रोखनं असंभव होतं. कारण प्रकल्प जरी योग्य दिसत असला तरी सरकारी गौरसरकारी  लोकांचा त्यात हस्तक्षेप होता. म्हणून रवीने दुसरंच पाऊल उचलायचा निर्णय घेतला होता. गावकऱ्यांच्या चर्चा सरकारी कर्मचाऱ्यां पर्यत पोहचत होत्या, त्यातूनच मालन आणि सुंदर ची कहानी ही सरकारी लोकां पर्यंत पोहचली. गावात आज इंजिनियर लोकांचा पहिलाच मुक्काम होता. गावाच्या चावडीवर तीन कर्मचारी जेवनाच्या बेतात होते तशी अचानक लाईट गेली, काळोख चहूकडे पसरलेला होता आणि रातकिडे किरकिरत होती, मधूनच घुबडाचा चित्कार कानावर येत होता. तितक्यात दरवाज्यावर कुणाची तरी थाप पडली. करजकर बुवा कमालीचे भित्रे.... लटलट कापत त्यांनी रामराम जप सुरु केला. सोबत च्या गुंड्या भाऊने रोखून पहाताच ते जरा शांत झाले. गुंड्या भाऊने पुढे जाऊन दरवाजा उघडला तसा एका घुबडानं ओसरीतल्या खिडकीतून पळ काढला. गुंड्या भाऊ कोण कोण करत आजू बाजूला बघत होते. तोवर चावडीच्या छतावर कुणी तरी धप्पकन कुदल्याचा आवाज झाला तसे करजकर बुवा दरवाज्या कडे पळायला लागले. तितक्यात त्यांच्या धोतराचा काष्टा सुटला व ते धप्पकन खाली पडले. आता मात्र ते गुंड्या भाऊला न भिता मारोती स्त्रोत जोरजोरात उच्चारु लागले. वासनकर साहेब दारू ढोसून पडला असल्यानं त्याला यातलं काहीच माहीत नव्हतं. तितक्यात लाईट ही आली सारं काही पूर्ववत झालं पण करमकर बुवा तिथं थांबायला तयार नव्हते. ती रात्र त्यांनी कशीबशी काढली. गावात या बाबतीत चर्चा सुरु झाली तर कामिनीच्या सांगण्यावरून सुंदर आणि मालनच्या भुतांची कहानी चर्चेत आली. गुंड्या भाऊ दोघांना समजवू पहात होते, वासनकर रात्री शुद्धीत नसल्यानं ते थांबायला तयार होते. पण करमकर बुवा ने वडाप धरलीच.त्यांच्या जागेवर दुसरे दोन माणसं ठेकेदाराकडून त्या सरकारी माणसांच्या मदतीला पाठवण्यात आले त्यांनी अगोदरच दोन मोठमोठ्या टॉर्च सोबत आणल्या होत्या. आज ते चौघं भुतांशी दोन हात करायला तयार होते. रंगा गवळी दूध तापवून नुकताच निघून गेला होता. दारात दोन काठ्या चमकत होत्या. आज लाईट गेली नव्हती तरी चावडीच्या पत्र्यावर धप्पकन दोन जण कुदल्याचा आवाज झाला. तसे काठी घेऊन गुंड्या भाऊ सोबत एक जण बाहेर धावला. पण सारं निरर्थक घरामागे अंधारातून कुणी तरी निघून गेल्याचा भास झाला गुंड्या भाऊ टॉर्च टॉर्च ओरडले, तसे वासनकर साहेब आणि दुसरा सहकारी टॉर्च घेऊन बाहेर धावले तितक्यात लाईट ही गेली. हातातल्या टार्च ऑन करण्या आधीच ते धडपडून पडले. अंधारात चौघे एका ठिकाणी जमा झाले. दोघं ही टॉर्च जळत नव्हत्या. गुंड्या भाऊ जाम वैतागले. चाचपडत आत येऊन दिवा लावला. आज हा प्रकार जेवना आधीच घडला वासनकर शुद्धीत असल्यानं त्यांना कालचा प्रकार आज खरा वाटू लागला. ते इकडे तिकडे भितीयुक्त नजरेनं पहात असतांनाच घुबडानं घुत्कार करत पळ काढला. आता मात्र वासनकरांची फाटली होती. गुंड्या भाऊला ही काही तरी असल्याची शंका मनात येऊ लागली. गावातून या प्रकल्पाला गावकरी नाखूश असल्यानं त्यांचा तर कावा नाही ही शंका मनात येत होती. पण गावकऱ्यांच्या काढलेल्या माहिती नुसार ते खूपच अंधश्रध्दाळू होते. त्यामुळे त्यांच्यावर संशय घेणे योग्य नव्हते. गुंड्या भाऊने एकाची मदत घेत रंगाला बोलावून घेतलं. रंगा रात्रभर थांबला ही पण सकाळी धार काढायचीय म्हणून लवकर जायची घाई करू लागला.रंगा गुंड्या भाऊ सोबत जायला निघाला, तसा एकदम दचकला. रंगाची म्हैस चावडी समोरच उभी होती,जवळच धार काढायची बादली ही पडली होती. रंगाची बोबळी वळली तो म्हणाला साहेब हे कसं झालं? म्हैस आणि बादली कशी आले इथे......आणि लटलट कापायला लागला. आतले दोघं जण बाहेर आले होते. त्यांनाही हा प्रकार नवीन होता रंगाची म्हैस चावडीवर जाण्याची चर्चा गावासोबत शहरातल्या ऑफिसात ही पोहचली. आणि नुसती भूतचर्चाच नाही तर सोबत वासनकर साहेब ही पोहचले. रोज काही ना काही घडत होतं माणसं बदलत होती, प्रकारही बदलत होता. कधी जात्यावरच्या ओव्या ऐकू येत होत्या, तर कधी मशाली पेटून नाचत होत्या. गावकऱ्यांच्या म्हणण्या नुसार आवाज आणि ओव्या मालनच्या होत्या. तर्कवितर्क केले जात होते. बुद्धीजिवीं व स्वतःला निडर म्हणवणाऱ्यांना तिथे थांबवलं जाई. पण सारं व्यर्थ.....        पण आज जरा चित्र वेगळं होतं.काही गावकऱ्यांना ही तिथं थांबवण्यात आलं होतं. चार सहा शहरी बाबू आणि गावातले काही म्हातारे आज भूताशी लढणार होते. आकाशात विजा चमकत होत्या पाऊस धोधो बरसू लागला. अंधारात वीज चमकली म्हणजे समोरून येणारा दिसायचा अन्यथा घोर अंधार होता चावडीच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावर एक बैल गाडी येतांना चमकत होती गाडीत काही तरी सामान पालाखाली झाकल्याचं जाणवत होतं. धूरकरी अंधूकसा दिसत होता. गाडी जवळ आली तसा विजेच्या प्रकाशात धुरकऱ्याचा चेहरा स्पष्ट झाला. गावकऱ्यांच्या तोंडून एक सुरात आवाज निघाला.... सुंदर !हा तोच सुंदर अगदी हुबेहूब जेव्हा पासून गेलाय त्याच वयाचा, जिवंत असता तर मोठा वय झालेलं दिसलं असतं.      शहरी बाबू प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडे पाहू लागले. तशी सुंदरची बैलगाडी चावडी जवळच्या रस्त्याने पुढे निघून गेली.गावकऱ्याकरवी  गुंड्या आणि कंपनीला 25-30 वर्षापूर्वीचा सारा वृत्तांत सांगता सांगता पहाट  झाली. आता गावकरीही खूप घाबरले होते. सुंदर आणि मालनच हे सारं करत होते. आणि आज ही गावकरी रवीला शिव्या हासडत होते. शेवटी हे प्रकरण मिडीया पर्यंत पोहचलं. प्रकरण मिडियात गेल्यानं महाराष्ट्राच्या जनतेन ही प्रकरणात रस घेत अयोग्य अशा प्रकल्पाचा विरोध केला. आता मात्र गावकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या या प्रकल्पाला शासना कडून स्थगीत करण्यात आले. पण भूताटकीचा प्रकार मात्र जनतेला रुचला नाही. म्हणून जनतेनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी सरकार पुढे ठेवली, पण त्या समितीला काही करण्या आधीच सुंदर, मालन आणि रवी कॅमेऱ्यासमोर हजर झाले. आणि सारा वृत्तांत रवीनँ कॅमेऱ्या समोर ठेवला. मार्ग भुताटकीचा चुकीचा जरी त्याने अवलंबला होता तरी या शिवाय गावकऱ्यांना व गावाला वाचवायला दुसरा मार्ग त्याच्या कडे नव्हता. त्याच्या वडिलांसारखा चेहरा असणे त्याला या प्रकरणात मदतीचे ठरले. रंगा गवळी मावसा असल्याने बॅटरीतले सेल उलटे करायला व म्हैस बादली सहीत चावडी बाहेर यायला मदत मिळाले, पत्र्यावर उद्या मारण्याचं कामं नारळांच झाड नारळे गळून पडल्यानं अवचितच होत गेले. काही गोष्टी मात्र रविने तंत्रज्ञानाच्या मदतीनं केल्या.रवीनं फक्त गावच नाही वाचवलं तर गावकऱ्यांच्या अंधश्रद्धेवर ही लगाम लावला. मांजर आडवी जाऊनही रवी शिकून मोठा झाला. आमवश्येला जन्म होऊन ही आईला सुंदरने मारलं नव्हतं तर सुंदर आणि मालन सुखरुप होते फक्त अतिरक्तस्रावाने ती विक झाली होती तर सुंदर डोक्यावर मार लागल्यानं काही दिवस कोमात होता. त्यांच्या गाडीला ज्या भल्या माणसाकडून अपघात झाला त्यांनेच त्या उभयतांना वाचवले होते. आणि आता ठणठणित होते.  योगायोगानेच काही दिवस आधी रविशी त्यांची भेट ही झाली होती. मालन ने रविला कवटाळून आसवांचा बांध मोकळा करून दिला होता.


Rate this content
Log in