Dhanraj Gamare

Others

4.5  

Dhanraj Gamare

Others

भूत - एक मनातील भीती

भूत - एक मनातील भीती

3 mins
386


समीर नावाचा एक माणूस असतो . तो चांगली नोकरी करत असतो . त्याचे लग्न स्मिता ह्या स्त्रीशी झालेले असते . समीरला सुरेश नावाचा एक मुलगा असतो . त्यांचा संसार सुखाने चाललेला असतो . काही दिवस असेच चांगले घडत असतात . काही दिवसांनी समीरला अचानक रात्रीची झोप लागत नसते . स्मिताला आधी वाटते की , नोकरीचे काही टेन्शन असेल . म्हणून ती दुर्लक्ष करते . पण असे रोजच घडत असते . अश्या रोजच्या घडणाऱ्या घटनांमुळे स्मिता आणि सुरेशला भीती वाटू लागते . दुसऱ्या दिवशी स्मिता समीरला आपल्या ओळखीच्या फॅमिली डॉक्टरकडे नेते . स्मिता डॉक्टरांना सर्व घडलेला प्रकार सांगते . डॉक्टर म्हणतो हा तुमच्या मनाची कल्पना आहे . माणसाचे मन जे विचार करते त्याचे रात्री आपल्याला स्वप्न पडते असे म्हणून डॉक्टर नॉर्मल गोळ्या आणि औषधे देतो . काही दिवस समीरला आराम आणि चांगली झोप लागते . स्मिताला आता वाटू लागते की , आता समीरला कोणताच त्रास नाही . काही दिवस परत पहिल्या सारखे चांगले होतात . आता समीर पहिल्या पेक्षा अजून भीतीदायक वागू लागतो . स्मिता परत समीरला त्याच डॉक्टरकडे नेते . तो डॉक्टर मला काही हा प्रकार हाताळता येणार नाही , तुम्ही दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरकडे यांचा उपचार करा . स्मिता समीरला दुसऱ्या डॉक्टरकडे नेते . त्या डॉक्टरला स्मिता घडलेला सर्व प्रकार सांगते . तो डॉक्टर स्मिताला आणि सुरेशला बाहेर जाण्यास सांगतो . आता तो डॉक्टर समीरला प्रश्न विचारतो की , तुम्हाला काय दिसते , तुमच्या सोबत काय काय घडते ते मला सर्व सांगा . समीर घाबरत घाबरत सांगू लागतो , मी जेव्हा झोपण्यासाठी डोळे बंद करतो तेव्हा मला स्पष्टपणे कोणत्यातरी व्यक्तीचा दुःखद मृत्यू दिसतो . डॉक्टर हा अंधश्रद्धांवरती विश्वास ठेवणारा असतो . तो स्मिताला म्हणतो हा भयानक प्रकार आहे . तुम्ही चमत्कारी बाबांकडे यांना घेऊन जा . आधी स्मिताला काय करावे हे सुचत नव्हते , कारण तिचा आणि समीरचा अंधश्रद्धांवरती विश्वास नसतो . पण ती एक उपचार आणि कोणताही पर्याय उपलब्ध नाही असे समजून समीरला डॉक्टरने सांगितलेल्या चमत्कारी बाबांकडे घेऊन जाते . तिघेही चमत्कारी बाबांच्या मठात पोहचतात . स्मिता घडलेला प्रकार चमत्कारी बाबांना सांगते . बाबा लगेच म्हणू लागतो की , हे सगळे एका भुतामुळे घडत आहे . तुम्ही फळे , हार , चार कोंबड्या आणि दोन बकरे बळीसाठी घेऊन या . स्मिता मग सामानाचा बंदोबस्त करण्यासाठी समीरला आणि सुरेशला घेऊन घरात येते . घरी पोहचल्यावर स्मिताला तिच्या आईचा फोन येतो . ती फोन उचलते आधी ती काही आईला घडलेला प्रकार सांगणार नसते , पण नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात . मग तिची आई स्मिताला विचारते , मग ती घडलेला सर्व प्रकार आईला सांगते . तिची आई शिकलेली असते . आई म्हणते आधी रडणे थांबव आणि त्या चमत्कारी बाबांवरती विश्वास ठेवू नकोस . मी बाबांना सांगते , जावई बापूंना चांगल्या मानसोपचार तज्ञांकडून दाखवून आणा . थोड्यावेळात स्मिताचे बाबा मानसोपचार तज्ञांना सोबत घेऊन येतात . मानसोपचार तज्ञ सर्वांना खोलीच्या बाहेर जायला सांगतो . तो मानसोपचार तज्ञ समीरला प्रश्न विचारतो , समीर सर्व सांगू लागतो . मानसोपचार तज्ञ बाहेर येतो . काळजी करू नका असे सांगतो . मग स्मिताला प्रश्न विचारतो की , समीर हे दवाखान्यात नोकरी करतात त्यामुळे त्यांनी आपल्या डोळ्यासमोर अनेक लोकांचा प्राण किंवा मेलेल्या माणसांना बघितले आहे . त्यामुळे हे साहजिकच आहे की त्यांना अश्या गोष्टींचा भास होणार . म्हणून त्यांना आज आराम करू दे . मी काही गोळ्या लिहून देतो . त्या त्यांना जेवणानंतर खायायला सांगा . असे म्हणून मानसोपचार तज्ञ निघून जातो . बाबा स्मिताला म्हणतात की , बाळा अश्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस . जगात भूत वगैरे काही नसते . असे म्हणून स्मिता आणि सर्वजण हसू लागतात . आणि पुन्हा अंधश्रद्धांवरती विश्वास ठेवणार नाही असे म्हणतात.


लेखक - © धनराज संदेश गमरे


Rate this content
Log in