भारत
भारत


भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रतिज्ञा आपण शाळेत सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी घेतो. आपण कधी विचार करतो का हो .. कि हा आपला भारत देश कसा आहे ? त्याची संस्कृती काय ? जागतिल इतर देशां पेक्षा कसा वेगळा आहे . काळा पासून आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे.
जगातील सर्वात जुन्या म्हणून गणल्या जाणाऱ्या संस्कृती पैकी भारतीय संस्कृती आहे असे म्हंटले जायचे किंवा आपण आपल्या पूर्वजांकडून ,पुस्तकातून ,इतिहासातून अभ्य्साले देखील आहे कि ,आपल्या भारत देशातून सोन्याचा धूर निघत होता. ह्यात वावगे असे काही नाही व खरे आहे कि पूर्वी खरोखर अशी श्रीमंती होती .इंग्लंड स्पेन फ्रान्स व पोर्तुगाल या देशातून लोक व्यापारासाठी येत आणि आपली तुंबडी भरून भरून संपत्ती संपत्ती घेऊन जात होते. आंब्यांची लगडलेल्या झाडाला खोडकर पोरांनी दगड मारून आंबे तोडावीत तसे ह्या व्यापाऱ्यांनी आपली संपत्ती लुटून न्यायला सुरुवात केली .यातच आपला कोहिनुर हिरा देखील इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात खोवला गेला .आणि इथून पुढच्या काळात देशाचे दोन तुकडे झाले