Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

vaibhav PAWAR

Others


2.5  

vaibhav PAWAR

Others


भारत - २ भारतीय संस्कृती....

भारत - २ भारतीय संस्कृती....

2 mins 398 2 mins 398

भारतीय संस्कृती..... म्हणजे आशावाद, सहानुभूती, सत्य, विशालपण, प्रयत्नांची पराकाष्ठा, पराकाष्ठा संग्राहक... महत्वाचे सर्वाना सामावून घेणारी आपलेसे करणारी संस्कृती. सर्वे सुखिनः संतू सर्वे संतू निरामय, सर्वे भद्रानी पश्यन्तु.. सारे सुखी असोत, सारे निरोगी असोत, ही संस्कृतीची ध्येय आहेत.


काश्मीर ते कन्याकुमारी अशी विविधतेने नटलेली व सहिष्णू संस्कृती. ही भारतीय संस्कृती आपल्याला साधना शिकवते, सोबत संयम हा आत्मविश्वास असे म्हटले तर वावगे  नसावे. कारण भारतीय संस्कृती संयमावर उभारलेली आहे. 'जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदार विचारे वेच करी’ धन मिळवू नका रे, हा संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगत नाही. परंतु, धन उत्तम व्यवहाराने जोड आणि जोडलेले धन हे विवेकाने खर्चावे असे सांगत आहे.

 

अवघाचि संसार सुखाचा करिन आनंदे भरीन तिन्ही लोक, ही भारतीय संतांची घोषणा आहे. आपण जन्मतः तीन ऋणे डोक्यावर घेऊन येतो, असे आपली भारतीय संस्कृती सांगते. ऋषीऋण, पितृ ऋण व देवऋण हे आपणास फेडावयाचे असतात. ऋण फेडावयाचे म्हणजे आपण सर्वांचे व्हायचे.


यत्र नार्यस्तु, पूजन्ते रमन्ते तत्र देवता देवता... अशी स्त्रियांची महिती सांगणारी आपली भारतीय संस्कृती. भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती, तपस्या, मुकसेवा होय. अलोट श्रद्धा आशावाद... आजची स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर एक पाऊल एक पाऊल पुढेच आहे ती सर्वच क्षेत्रात. यामुळेच भारतीय संस्कृती सर्वत्र मातृ वंदना करीत आहे.


मातेला तीन प्रदिक्षिणा म्हणजे सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे होय. आई वडिलांची सेवा करणे म्हणजे मोक्ष मिळवणे.


भारतीय संस्कृतीचे मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध आहे. पशु, पक्षी, वृक्ष, वनस्पती यांच्याशी असे जिव्हळ्याचे संबंध जोडण्याचा भारतीय संस्कृतीने प्रयत्न केला आहे. अशा प्रकारची ही प्रेममयी भारतीय संस्कृती आहे.


अहिंसा परमोधर्म भारतीयांच्या रोमारोमात हे तत्व बिंबवले आहे. उद्या जगातील सर्व लष्करे चुटकी सरशी नाहीशी होतील असे महात्माजी म्हणत नाही. हिंदुस्तानातही लष्कर - आरमार सारे लागेल. शस्त्राची बंदी उठवावी ही अशी दहा मागण्यात एक मागणी होती. अशा या आपल्या महान संस्कृतीत एकेक ध्येयासाठी सर्वस्वाचे समर्पण, घरावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या महान विभूती आपणास दिसतात आणि याच महान विभूतिचा इतिहास म्हणजे भारतीय संस्कृती. थोर पुरुषांची माहिती चरित्रे म्हणजे भारतीय संस्कृती असे वचन आहे.


यात सत्यासाठी वनात जाणारे प्रभू रामचंद्र, सीता, भरत, लक्ष्मण, वैराग्य मूर्ती शुक, बालभक्त प्रल्हाद, सत्यमूर्ती राजा हरिश्चंद्र, महारथी कर्ण, थोर राजा बळी अशी अनादी नावे घेता येतील.... 


Rate this content
Log in