प्राजक्ता रामराजे पाटील

Children Stories Comedy

3  

प्राजक्ता रामराजे पाटील

Children Stories Comedy

बालपणातील किस्से

बालपणातील किस्से

2 mins
177


पाहुण्यांसाठी डोसा बनविण्याचा बेत योजला एकेदिवशी..

तांदूळ, उडदाची डाळ आणि हरभरा डाळ थोडीशी..

भिजत ठेवली रात्रभर.. सकाळ होताच वाटून घेतली भरभर..

येता पाहुणे आता बनवीन मी डोसे सरसर..

म्हणून सांबर चटणी ची करू लागले आवरा आवर..

पाहुणे आले का..? डोसे खाल्ले का..? कळेल तुम्हाला हा लेख वाचल्यावर...


प्रत्येक मुलाला आपल्या आई ने बनवलेला कोणताही पदार्थ खूप आवडत असतो. असा माझ्या मुलांना माझ्या हातचा आवडणारा ऑल टाईम फेवरेट पदार्थ म्हणजे डोसा. टिफिन मध्येही डोसा आवडतो. थंड होतो म्हणून सांगितलं, तरीही असुदे थंड झालेला सुद्धा आवडतो आम्हाला असा हा कुरकुरीत डोसा. वाटण तयार असेल तर चटकन होणारा. माझ्या मोठ्या मुलाच्या क्लासमध्ये अर्णव नावाचा मुलगा होता. आणि त्यालाही माझ्या मुलाने टिफिन मध्ये नेलेला डोसा खूप आवडायचा. हे मी नेहमी माझ्या मुलाकडून तसेच अर्णव च्या आईकडून नेहमी ऐकायचे.


एके दिवशी मी माझ्या मुलाला शाळेत सोडायला गेले. तिथे अर्णव ची आई पण अर्णवला सोडायला आली होती. गप्पा मारता मारता मी त्यांना म्हटलं, "उद्या संडे आहे, तर या आमच्या घरी." नक्की येईन. मलाही यायच होतच तुमच्याकडे." त्या म्हणाल्या. तुम्ही डोसे खूप छान करता अस अर्णव मला नेहमी सांगतो. तुम्हाला प्रमाणही विचारायचं होतं डोसा बनवण्यासाठी लागणारं. फोनवर विचारण्यापेक्षा घरी जाऊ म्हटलं होतं. या मग उद्या मी डोसेच बनवेल. नाश्त्याला या लवकर. हो म्हणून दोघीही आपापल्या घरी आलो.


उद्या अर्णव ची आई येणार म्हणून मी दुपारीच तांदूळ आणि उडीद डाळ थोडीशी हरभरा दाळ स्वच्छ धुऊन भिजत घातली. रात्री झोपायच्या आधी वेगवेगळ्या भांड्यांमध्ये बारीक वाटून झाकून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ नेहमीप्रमाणं फुगलेले पाहिलं. त्यात मीठ घातलं. तिन्ही पीठ एकाच भांड्यात मिक्स करून ठेवली. सगळी तयारी अगदी व्यवस्थित झाली होती. म्हणून चटणी वाटण्यासाठी मिक्सर कडे तोंड करून उभी होते. मिक्सर च्या आवाजामुळे कसलाही आवाज आला नाही. वाटून झाल्यावर मागे फिरून पाहिलं माझ्या लहान मुलाने पाण्याने डोशाच्या पिठाचे पातेले गच्च भरले होते.बापरे ! म्हणून कपाळावर आठ्या उमटल्या.


लहान असल्यामुळे त्यालाही रागवून काहीच उपयोग नव्हता पंधरा-वीस मिनिटात अर्णव च्या आईही येणार होत्या त्यामुळे हॉटेलमधून डोसे मागवावे लागले. तेव्हा परत साहित्य भिजत घालून दुसऱ्या दिवशी भरपूर डोसे बनवले. अर्णव च्या आईलाही पार्सल पाठवले. डोसे बनवताना मला नेहमी हा किस्सा आठवतो. मुले आता मोठी झाली पण त्यांचे बालपणातील किस्से आठवले की ते हरवलेलं बालपण गवसतं..


Rate this content
Log in