Prajakta Patil

Children Stories Comedy

3.5  

Prajakta Patil

Children Stories Comedy

आठवणी फोटोमागच्या

आठवणी फोटोमागच्या

2 mins
85


खरंच रम्य ते बालपण म्हणतात हे अगदी खरंय...बालपणीचे किस्से असेच असतात अगदी हृदयाच्या इवल्याश्या कुपीत जपून ठेवण्यासारखे..


आणि त्यातल्या त्यात ते फोटोत कैद झालेले असले तर मग तो फोटो काढताना आपण केलेल्या वेगवेगळ्या कृती फक्त आपल्या स्वतःलाच माहीत असतात.


असाच एक किस्सा म्हणजे लग्नप्रसंगी लहान मुलांना नेहमीच नवरा नवरी पाहण्याची उत्सुकता असते. मग ती मुले अगदी नवरदेव-नवरीला चिटकून बसतात. माझ्या आईबाबांच्या लग्नात आमच्या नातेवाईकांचा लहान मुलगा अगदी बाबांना चिटकून बसलेला होता. मग ते असतं ना, लग्नात नवरा नवरीनी एकमेकांना फराळाच्या पदार्थांपैकी एक एक पदार्थ भरवत असतात. मग सुरुवातीला फोटोग्राफर फक्त अ‍ॅक्शन चा फोटो घेतो. अन् सगळ्या अ‍ॅक्शन कॅमेर्‍यात कैद झाल्यावर तो पदार्थ नवरा नवरीनी कडून खाल्ला जातो. खूप वेळ फोटोग्राफर च चाललेलं इकडे बघा, तिकडे बघा आणि आई-बाबा "आ" करून घास घेत नाहीत म्हणल्यावर, त्या मुलानेच "आ" केलेला फोटो कॅमेर्‍यात कैद झाला.


मग प्रत्येक वेळी लग्नाचा अल्बम बघताना प्रत्येकजण तो फोटो पाहिला की खदखदून हसायचा.


------------------------------------------------------------


किस्सा-2


आता आमच्या शाळेतला "सांस्कृतिक कार्यक्रम" आणि त्यातील गमतीजमती..


शाळेत असतानापासून वाचन,लेखन हा छंद तर होताच पण भाषण करायची प्रचंड आवड होती. मला नृत्य मात्र जमत नव्हते पण सहभागी होण्यासाठी मॅडमना माझ्या सोबत मैत्रिणींची पण रिक्वेस्ट केली की, "प्राजक्ता आमच्या डान्स मध्ये हवी आहे म्हणून." ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत मुलांची संख्या कमी असल्यामुळे मॅडमच प्रत्येक मुलांकडे वैयक्तिक लक्ष असतं आणि मॅडम शी असलेलं नातं खूप गोड असतं. त्यामुळेच मॅडम नी मला घेतलं पण काही केल्या मला स्टेप्स जमेनात आणि आम्हाला नाराज नको करायला, म्हणून मॅडमनी त्याच गाण्यात मला सासूबाईंचा रोल दिला. 


आणि मग तो दिवस उजाडला ज्या दिवशी आमचा सांस्कृतिक कार्यक्रम थाटात पार पडणार होता. शाळेतला संस्कृतिक कार्यक्रम म्हणजे गावातल्या लोकांसाठी आनंदाचे पर्व असायचा. अगदी लहानथोरा पासून संपूर्ण गाव हा कार्यक्रम पाहण्यासाठी जमायचा. कार्यक्रम चालू असताना फोटोग्राफर फोटो काढायचा. तो फोटोग्राफर दोन-तीन वेळा मला म्हणाला, "इकडे बघा, इकडे बघा." मी काही पाहिलेच नाही. तेव्हा तो फोटोग्राफर मला म्हणाला, "सासुबाई, इकडे बघा." मग मात्र मी खूप रागाने त्याच्याकडे पाहिले. आणि त्याने तो फोटो काढला.


Rate this content
Log in