बाजार मांडलाय
बाजार मांडलाय


रात्रीच्या त्या अंधारात घराच्या त्या चार भितींमध्ये त्या एकदम सुनसान वस्तीत देह विक्रीचा धंदा दररोज चाललाय.
पैशापाई तिच्या अब्रूचा बाजार मांडलाय.
जन्म दिलेल्या बाळाला तीने छातीवरच दूध कधी पाजले नाही का कधी कवटाळुन घेतल नाही.
हौसेपाई त्यांंने तिच्या छातीवरचा पदर फाडलाय
देह विक्रीचा धंदा दररोज चाललाय.
पैशापाई तिच्या अब्रूचा बाजार मांडलाय.
भिती नाही कोणाची त्यांना की बंधन नाही कोणाचे
असेच जीवन म्हणते आहे सोन्याचे.
जसे ताटात त्यांचा गोड खाऊच वाढलाय
देह विक्रीचा धंदा दररोज चाललाय.
पैशापाई तिच्या अब्रुचा बाजार मांडलाय.
झोप नाही कधी तिच्या डोळा की अन्न कधी गेल नाही पोटात.
जो येतोय तो दाखवतो नोटाच-नोटा तिच्या अंगावर
त्यांने जसा पैशाचा पाऊस पाडलाय
देह विक्रीचा धंदा दररोज चाललाय
पैशापाई तिच्या अब्रूचा बाजार मांडलाय
पोटाच्या भुकेपाई झाकलेली इज्जत आज तिला उघड्यावर दाखवावी लागते
जो पर्यंत हौस त्यांची भागत नाही रात्रभर जागते लचके तोडताना तिचा जिव रडलाय
तरी सुध्दा देह विक्रीचा धंदा दररोज चाललाय
पैशापाई तिच्या अब्रुचा बाजार मांडलाय