अविभावित
अविभावित


मीनाला नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी उशीर झाला होता. तिची मैत्रीण प्रिया रोजच्या वेळेत तिच्या दारात येऊन उभी आणि नेहमी प्रमाणे आईने मीनाला ओरडायला सुरवात केली, “उठत जा ग मीना लवकर, प्रिया बघ तुझ्यासाठी रोज दारात येऊन थांबते तुझ्यामुळे तिला पण उशीर होतो”. मीना मात्र तिच्याकडे लक्ष न देता तीच ती आवरून निघून गेली. उशीर झाला म्हणून धावत जाणे हा तिचा रोजचा कार्यक्रम. असे होत होत तिची दहावीची परीक्षा संपली आणि शाळेला अखेरचा पूर्णविराम दिला.
जसे स्वभाव वेगळे त्याप्रमाणे कितीही जिवलग मैत्रीणी जरी असल्या तरी करिअरच्या वाटा वेगळ्या होत्या. म्हणून मीनाने कला शाखेची व प्रियाला चित्रकलेची आवड असल्याने तिने त्या शाखेची निवड केली. रोजच्या व्यस्त schedule मुळे दोघींची भेट पहिल्यासारखी नाही पण दिवसातून एकदा तरी व्हायची. काही दिवसांनी ते ही बंद झाल. काही काळाने म्हणजेच दोन वर्षांनी त्या वेळ काढून भेटल्या.त्याांच्यामध्ये गप्पा रंगल्या, दोघीही एकमेकांना मनातल्या गोष्टी सांगू लागल्या व्यक्त होऊ लागल्या. रोजचा दिनक्रम तसेच महाविद्यालयातील गमतीजमती, तसेच नव्या मैत्रीबद्दल साांगता साांगता ( प्रियाने तिच्या एका मित्राबद्दल सांगितले ) गप्पा रंगल्या असता दोघीांना कळलंच नाही कि सूर्य अस्ताला गेला होता. भानावर येताच त्या एकमेकींचा निरोप घेऊन निघून गेल्या . त्या दिवशी ठरल्याप्रमाणे अधूनमधून भेटत असत. जेव्हा पण भेटत तेव्हा मीनाला प्रियाच्या तोंडून तिच्या मित्राच कौतुक ऐकायला मिळे . एक दिवस न राहून मीनाने प्रियाला प्रश्न केला हा कोण आहे ग? प्रियाने ऐकून न ऐकल्यासारखां केल आणण ती मनातल्या मनात हसत निघून गेली. परंतु मीना त्याचा विचार करू लागली कारण त्या मित्राने तिच्या मनात घर केल होत. न राहून मीनाने प्रियाला त्याच्याबद्दल विचारलं . प्रियाला तिच्या मनातल कळाल, तिने तो जसा आहे तसा सविस्तर वर्णन करून सांगितलं. नकळत मीनाला तो आवडू लागला, पण फक्त आवडला हं.....
काही दिवसांनी प्रियाने फिरायला जायची कल्पना मीनाला सांगितली . कल्पना आवडताच तिने पटकन विचारले , तो पण येईल का ग? प्रियाने कळून न कळल्याचा भाव चेहर् यावर आणला. फिरायचा दिवस ठरवण्यासाठी त्याांनी भेटायचे ठरवलं त्यात ‘त्याला’ ही आमंत्रण होतच पण त्याच्या गैरहजेरीमूळे मीनाची चिडचिड झाली. ती स्वतः शीच बोलू लागली,” समजतो कोण स्वतः ला, यायला नाही जमणार म्हणे, जाऊ दे मी का विचार करतेय” आणि तो विचार तिने डोक्यातून काढला. फिरण्याचा दिवस ठरला त्या दोघीांसह त्याांचे मित्र – मैत्रीणी ही फिरायला गेले. सगळे मज्जा करून परत आल्यावर पुन्हा आपापल्या कामाला लागले.या सगळ्या गोष्टींमध्ये मीनाच्या मनातून त्याने काही exit घेतल नव्हतं . मीना अजुनही त्याच्याच विचारांमध्ये होती. अशा सगळ्या गमतीजमती मध्ये तीन वर्षे गेली. आणि एक दिवस अचानक मीनाला प्रियासोबत तिच्या कॉलेज मध्ये जाण्याची संधी मिळाली . तिथे पोहचताच मीनाची नजर त्याला शोधू लागली. तो कसा दिसतो , त्याच नाव काय याच भानही तिला नव्हतं , तरीही ती शोधत होती आणि तेवढ्यातच प्रियाने रिषभ अशी हाक मारली. काहीही माहीत नसलेल्या मीनाच्या मनात हालचाल सुरू झाली. लाज, भिती, उत्सुकता अशा सगळ्या भावनांनी ती भारावून गेली,मनात कसतरी व्हायला लागलं . कोण आहे हे बघण्यासाठी ती मागे वळली तेवढ्यातच प्रियाने तिची ओळख करून दिली .मीनाच्या
नजरेतील चमक, मनातील भाव हे सारे चेहऱ्यावर आले होते जे कधीही या पूर्वी प्रियाने पाहीले नव्हते. त्या नंतर चे सगळे दिवस तिचे आनंदात जाऊ लागले. उगवणारा प्रत्येक दिवस तिचा त्याच्या आठवणीत रमण्यात जात होता. आता हळूहळू तिलाही उमजायला लागले होते. तिचा स्वतःशी सांवाद सुरू झाला, हे नक्क काय आहे? यालाच प्रेम म्हणतात का? जे काही आहे ते खूप छान आहे. मग हे मला त्याला सांगायला हवं का? हो… हवच असा ठाम विचार करुन तिने आधी प्रियाला सांगायचं ठरवलं. प्रियाला हे कळताच ती तिच्यासाठी खुश होऊन म्हणाली, “तुझी निवड खूप छान आहे हा मीना.“ या सगळ्याची कल्पना प्रिया कडून रिषभ मिळतच होती. आपणच पुढाकार घ्यायला हवा असा विचार करुन मीना व प्रियाने दिवस ठरवला आणि नेहमीप्रमाणेच उशीरा निघून प्रियाच्या कॉलेज मध्ये गेली कारण तो तिथेच असणार याची खात्री होती.
पाच वर्षांच्या या लपाछपीच्या प्रेमाला आज वाचा फुटणार या विचारात असतानाच तिला चक्कर आली व ती रस्त्यावर कोसळली. कारण या सुखावह आनंदाच्या वर्षांमध्ये ती विसरून गेली होती की तिच्याकडे जगण्यासाठी फक्त पाच वर्षेच आहेत. आणि तिचे प्रेम व्यक्त होण्याऐवजी अव्यक्तच राहिले ……..