अजून किती वर्ष?
अजून किती वर्ष?


आजच्या घडीला महिलांसाठी सुरक्षा कवच कीतीही केली तरीही गुन्ह्यात काहीच कमीपणा येत नाही. उलट गुन्हयाचे प्रमाण वाढत आहे.
आजही एखादी तरुणी कॉलेज, क्लास, कामावरुन रात्रीच्या 7.30 नंतर एकटी घरी येण्यास घाबरते.
ती घरी पंधरा मिनिटे जरी उशिरा येत असेल तरी तिच्या मोबाईल वर घरच्यांचे कितीतरी फोन येत असतात...
याचा अर्थ तरुणी महिला अजुनही सुरक्षित नाहीत.
प्रश्न आता फक्त रात्रीचाच राहिला नाही आहे तर दिवसा ही एखादी महिला, तरुणी एकटी बाहेर फिरण्यास धसकते.
मनात किती भीती भरली आहे ना महिलांच्या. भीती तरी कशी गायब होणार.. रोजच वर्तमानपत्रात, टी:व्ही बातम्यात महिलांच्या अत्याचारांबद्दल येतच असतं. रोज कुठे न कुठे महिलांचा विनयभंग होतच असतो.
महिलांसाठी हेल्पलाईन नंबर, त्यांच्या सुरक्षतेसाठी अँप जरी तयार केले असले, तरीही गावात राहणाऱ्या महिलांना हे अँप्स वापरता येत नाही, किंवा तो हेल्पलाइन नंबर त्यांना माहीत नसतो, म्हणजे कुठे तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही.
रेप, विनयभंग, छळवणूक करणार्या गुन्हेगारांना कायद्याचा धाकच नाही. कारण कितीतरी गुन्हेगार असे गुन्हे करुन समाजात सहजपणे वावरताना दिसतात कुणी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धमकी दिली जाते. आणि जे कायद्याच्या कचाट्यात सापडतात त्यांना वेळेवर हवी तशी शिक्षा मिळत नाही. आणि त्यामुळे इतर गुन्हेगारांना असा गुन्हा करण्यास कायद्याची भीती वाटत नाही. अरे बस झालं यार... हे असे रेप कधी पर्यत चालणार? स्त्रियांनी जीव मुठीत धरूनच राहायचं का? भारतात कडक कायदे कधी निघणार? समाजातील माणसे फक्त मेणबत्त्या, पोस्टर घेऊन मोर्चाचं काढणार का?
इतके वर्षे मेणबत्त्या, पोस्टरवरचं थांबलोय आपण...
मला असे वाटते की महिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तींना कायद्यातून शिक्षा मिळावीच पण त्या आधी समाजातून ही, समाजातील लोकांकडूनही त्यांना कडक शिक्षा मिळावी.
भर रस्त्यावर छेड काढणार्या व्यक्तीला तिथल्या लोकांनी पुढाकार घेऊन शिक्षा दिली पाहिजे. (अरे करा नागडा त्याला आणि काढा वरात रस्त्यावरून. आणि व्हिडीओ करून करा व्हायरल, द्या ह्या वरातीला प्रसिद्धी वर्तमानपत्रात आणि टीव्हीच्या बातम्यांमध्ये ). आणि मग कायद्याकडून मरणासाठी भीक मागेल अशी शिक्षा जर मिळाली तर मग अश्या गुन्हेगारांना गुन्हा करताना नक्कीच विचार करावा लागेल.
पण जर एखाद्या महिलेचा बलात्कार, तिच्यावर अत्याचार, तिचा विनयभंग होत असेल आणि बाजूला लोकांचा जमाव कायद्याला घाबरुन फक्त ते सर्व बघत असतील तर तो गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला, त्या गुन्हेगाराला कधीच भीती वाटणार नाही. पण तिथे असलेल्या लोकांनी त्याला पकडून त्याच्या कृत्याची जाणीव करुन दिली. त्याला तिथेच शिक्षा दिली तर असे गुन्हे नक्कीच कमी होतील असे मला वाटते.
पटल्यास शेअर करा. आणि आता मोर्चात जायचे सोडा अन असे राक्षस दिसले तर त्याला तिथेच धडा शिकवा.