आई वडील दैवत
आई वडील दैवत
का आपलेच लोक गुन्हेगार होतात ?कधी जाणून बुजून तर कधी नकळत .पण नकळत का असेना मन दुखवून जातात.विचार करायला भाग पाडतात खरंच हि ,हा आपलेच का !जे असं हि वागू शकतात.
लहानपणा पासून सर्व सांगणारा मुलगा का नकळत दुरावतो.का मन मोकळे पणाने बोलू शकत नाही.जीवाच रानं करून लहानपणापासून मोठं केलं तेच आई वडीलांना का समजून घेत नाही.का मुलं एवढी मोठी होता कि त्यांना आपण कुणाला बोलत आहे तिचं हि ऐकून घ्यावं असं का वाटतं नाही.आई तुम्हाला प्रिय मग तिचा मनाचा का विचार करत नाही.नाण्याचा कधी ही दोन बाजू असतात का एवढं सोपं गणित कळतं नाही.का मग कळून न समजल्यासारखं करतात हेच कळत नाही.
एक आई ची व्यथा खरंच स्वतः आई झाल्या शिवाय किंवा आपण स्वतः त्या परिस्थितीत जातं नाही त्या शिवाय कळतं नाही.हे ही तितकंच खरं. पण जेव्हा हे सर्व कळेल वेळ निघून गेलेली असते.का एवढं कळू नये आजच्या पिढीला.
म्हणून च कि काय असं म्हणता आई सर्व दुःख मुलाला न सांगता मुलीला सांगते .आई साठी मुलगीच तिचं मन रितं करण्याच एकमेव ठिकाण.
पण मी म्हणते मुलं का ते स्थान मिळवू शकत नाही.जर आई-वडील मुलं मुली वाढवताना भेदभाव करत नाही मग तुम्ही स्वतःका असंकरता.मुलीसारख तुम्ही ही तिला विचारा काळजी घ्या बायको च चुकलं वेळेत समजवा.वेळेत निर्णय घ्यायचा धाडस करा.आई अन् बायको समीकरण कधीच एक होतं नाही मान्य तरी आई आणि बायको च समतोल साधन प्रयत्न करा नाकि एकाची बाजू घेऊन मन दुखवा.
मान्य श्रावन बाळ होणार नाही तरी थोडा प्रयत्न तरी करावा नक्कीच आई मुलीला न निवडता मुलाला निवडेल.अनाथ आश्रम कमी होतील.खुप कठीण असतं मुलांना हे सर्व समजून वागन निभावून नेणं.तारेवरची कसरत असते मग ह्यावेळी नवरयाला बायकोने आधार द्यावा समजून घेणं वागणं . घरातील
कोणत्या गोष्टी सांगायच्या किंवा कोणत्या न सांगायच्या हे लक्षात असू द्यावे तरच घर घर होईल मंदिर पेक्षा कमीच ह्या घररूपी मंदीरात आई-वडील रुपी दैवत असेल नेहमी.
खरंतर नवरा बायको दोघांनी हे मिळून समजून वेळ देऊन एकमेकांनाच्या साथीने सहकार्य समजून घेतलं पाहिजे.तरच कोणत्या आईचं मन दुखावणार नाही.
आई म्हणजे दैवत ती दुखावली तिचं मन हृदय जर दुखावलं तर कधीच त्या घरात आनंद नसतो म्हणून सर्व मिळून समजून राहूनच उत्तम.
संसार म्हटलं कि तडजोड ,सुख दुःख आलेच
संकट हि येतात.पण मोठं मोठी संकटांना ही व्यक्ती
तोंड देऊ शकतो केव्हा जेव्हा तो मनाने सुदृढ असेल.
घरात सर्व मिळून मिसळून राहिले तर कोणतेही किती संकटे आली कशीही परिस्थितीत असली तरी सांभाळू
शकतो . परिवार मनुष्याची ताकद असते.
आज चा लेख सहज गुन्हेगार विषय अन त्यात
सत्य परिस्थिती तुन आईची व्यथा दुखी बोलून ऐकून
लिहावं वाटलं नक्कीच कोणी एक तरी परिवार सुखी होईल विचार करेल मुलगा असो किंवा मुलगी बायको
नवरा कोणी ही थोडं समजून घ्या मान्य ह आई वडील चुकतात पण त्याचं वय झालं कि समजून घ्यायची क्षमता कमी होते तेव्हा आपण त्याच आई-वडील होवून त्याची सांभाळ करावी.त्याचं हट्ट पुरवा त्यांना वेळ द्या.म्हातारपणी त्यांना फक्त प्रेम हवं असतं .हे सौभाग्य सर्वांना मिळत असं नाही.आपल्याला मिळालं आई-वडील आहेत कदर करा नंतर मग आहोतच मग एकटे .अन् चक्र फिरते वेळ थांबत नाही दाखवून देते आपण जसं करू तेच आपल्या वाटी पुन्हा येईल.एवढं समजून वागा बसं.शेवटी एवढंच सांगेन आपल्याला जन्म दिला आहे एवढंच लक्षात ठेवून सर्व दुर्लक्ष करून सेवा केली तर नक्कीच सर्व छान होईल.नको त्या गोष्टी सोडायचा जमलं तर दुर्लक्ष करायचं हाच कानमंत्र.
इगनोराय नमः
आई-वडील दैवत त्यांना दुखवू नका .
