STORYMIRROR

Datta Paymode

Others

4  

Datta Paymode

Others

व्यसन

व्यसन

1 min
371

व्यसनं सगळीच जीवघेणी

तुम्हांस काहीच का न कळे

इतके अनमोल शरीर तुझे

त्यांच्यासवे जळे


तंबाखू आणि चुन्याचा

चांगलाच जमतो मेळ

पण आयुष्याचा माञ

तुमच्याच होतो खेळ


खाणाऱ्यांना वाटे आपली

इतरांवेगळी स्टाईल

मग का म्हणून चेहऱ्यावरची

गायब झाली स्माईल


फॅशन म्हणून तुम्ही

उगीच खाता बार

निरर्थक पैसा खर्च करून

कुटूंबावर टाकता भार


विडी, सिगारेट, गांजा

तुम्ही हौसेने घेता

कॅन्सर सारख्या रोगाला

उगीच निमंत्रण देता


देशी असो की विदेशी

घाणच असते दारू

हळूहळू तिच तुमचे

आयुष्य लागते सारू


झाले ते थोडे झाले

आतातरी जागे व्हा

व्यसनाला दूर लोटण्यास

तुम्ही सर्व सज्ज व्हा


आता मिळून सारे

विचार करू पक्का

'निर्व्यसनी माणूस' असा

मिळविण्यासाठी शिक्का


Rate this content
Log in