व्हॅलेंटाईन वीक
व्हॅलेंटाईन वीक
1 min
439
व्हॅलेंटाईन वीकच्या युद्धसमयी
सगळ्यांच्याच पाठीवर गुलाबाच्या बाणांचे भाते
कुणाच्या पायाखाली पाकळ्यांचा गालिचा
पण खुडणाऱ्याच्या नशिबी मात्र नेहमीच काटे
बोलायचं खूप काही असतं आम्हालाही
पण ओठी मात्र आणता येत नाही
सात जन्माची वचने हल्ली
सात दिवससुद्धा टिकत नाही
ABCD च्या वयातली लहान मुलं
ILU चे पाढे गुणगुणतायेत
ज्यांना प्रेमाचा खरा अर्थ कळायला हवा
ते मात्र ऍसिड, पेट्रोलची बाटली शोधतायेत
सोशल मीडियाच्या कृपेने पुन्हा
कुणाचं पॅच अप तर कुणाचं हार्ट ब्रेक होईल
लोकं व्हॅलेंटाईन साजरा करत असताना कुणालातरी
जुन्या बॅलेंटाईनची नव्याने ओळख होईल
