वेळ
वेळ
1 min
64
जितका पैसा गाठीला
तितुके लोक भेटीला
आठवा जुन्या म्हणीला
लागती मुंगळे गुळाला
नसतं जेथे पाणी शिवारी
कोरडी असते जमीन फार
बळीराजाला त्या कधीच
देईना कुणी लवकर उधार
समोर जातो पाहुणा कधी
ओळख पटकन हो पटेना
अशी कशी ही वेळ आली?
अन् नाकाची चिंधी निघेना
बघता बघता बदलली वेळ
दुनियेत रोज नवी खेळ
जगी कुणा काही समजेना
अन् कोरोना जाता जाईना
देवाला आता घालू साकडे
एकदा तरी पहा आमच्याकडे
जगू दे रे नीट मानवाला
रोज का, नवे नवे कोडे?
