आजी
आजी
1 min
186
आजी म्हणजे असते
आशीर्वाद रुपी हात
आजी म्हणजे असतें
संस्कारांची बरसात
आजी म्हणजे खरं
मध जीवनातील
आजी म्हणजे सारं
सुख बालपणातील
आजी म्हणजे खरा
असतो संस्कृतीचा मळा
आजी म्हणजे असतो
घरी आनंदाचा सोहळा
आजी म्हणजे असते
गोड गोष्ट घरातील
आजी म्हणजे सारी
माया मनांमनातील
आजी म्हणजे खरं
घरातील अनुभवी मस्तक
आजी म्हणजे असते खरं
जगण्याचं पुस्तक.
