वेडावलेला निसर्ग
वेडावलेला निसर्ग
निसर्ग हल्ली वेड्यासारखा वागतोय..
नको त्या ऋतूत नको ते करतोय..
पावसाळ्यात काही केल्या, पाडत नाही नीट पाऊस..
त्यामुळे हवं तेव्हा फिटत नाही, आमची भिजण्याची हौस..
दररोज आठवणीनं छत्री घेतली, तर हा पठ्ठ्या करतो नाराज..
आणि कधी छत्री न घेता निघालो, तर हा पठ्ठ्या दाखवतो त्याचा माज..
हल्ली हिवाळ्याच्या मोसमात, थंडी सुद्धा घेते मोठ्ठी सुट्टी..
आणि ऐन हिवाळ्यात असं वाटतं, थंडीची झाली निसर्गाशी कट्टी..
सध्या उन्हाळ्याचा ऋतूच, त्याचं काम करतोय नेमाने..
आणि कोणत्याही ऋतूची बारी असो, हाच येतो मोठ्या जोमाने..
निसर्गाचे हे विचित्र रूप पाहून, सगळ्यांना येत आहे त्याची चीड..
पण समजून घ्या ह्याचं खरं कारण आहे, Global Warming ची वाढती कीड..
Global Warming ही कीड संपवायची, सुवर्ण संधी आहे आपल्या सगळ्यांकडे..
ज्यासाठी झाडं तोडणं नाही तर झाडं लावणं हा एकच उपाय आहे आपल्याकडे..
