STORYMIRROR

SACHIN KOTULKAR

Others

4  

SACHIN KOTULKAR

Others

असे असतात आज्जी आजोबा

असे असतात आज्जी आजोबा

1 min
184

आज्जी-आजोबा आणि नातवंडांचं गोड नातं..

म्हणजे प्रेमाच्या बँकेतलं अनमोल खातं..


त्यांचं निस्वार्थी प्रेम, हीच असते पावती त्यांच्या प्रेमाची..

आणि आज्जी-आजोबा असतील साथ, तर मग भीती कशाला कोणाची..!!


नातवंडांना खेळतांना बागडतांना पाहून, त्यांचं उर येतं भरून..

आणि काठीविना ही ते चालायची हिम्मत करतात, फक्त नातवंडांचा हात धरून..


नातवंडं येणार आजोळी, ह्या बातमीनं उडू लागतं त्यांच्या मनातलं फुलपाखरू..

आणि आनंदानी बहरून जातं, त्यांच्या म्हातारपणात लपलेलं गोड लेकरू..


मुलं म्हणजे मऊशार भात आणि नातवंडं त्यावर सोडलेली साजूक तुपाची धार..

आणि कोणी नातवंडांना ओरडलं, तर हेच करतात समोरच्याला एका शब्दात गार..


एकच विनंती आहे, घेऊ नका कोणी गैरफायदा त्यांच्या या प्रेमाचा..

कारण एकदा का त्यांचा विश्वास गेला, तर पश्चाताप होईल जन्मभराचा..


Rate this content
Log in