वारी पंढरीची
वारी पंढरीची
1 min
110
पारायणे करावी
गाथा, ज्ञानेश्वरीची
वाडवडिलांपासून सेवा
तुझ्या चरणांची
माझ्या घरी आहे
वारी पंढरीची ||१||
हातामधे काम
मुखी हरीनाम
हृदयात मुर्ती
पांडुरंगाची
माझ्या घरी आहे
वारी पंढरीची ||२||
कपाळी अबीर बुक्का
गळा माळ तुळशीची
आणिक नको काही
आस तुझ्या दर्शनाची
माझ्या घरी आहे
वारी पंढरीची ||३||
