STORYMIRROR

arvind kulkarni

Others

3  

arvind kulkarni

Others

रजस्वला

रजस्वला

1 min
112

मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त माझी एक स्वलिखित कविता सादर करत आहे .


रजस्वला 

विटाळशी ती तिला शिवू नका म्हणूनी

सारे जग हीनविते मला 

झाले मी रजस्वला म्हणूनीच ना रे

तू जन्माला आला ?

सृजनातून हे चराचर

 सृष्टी जन्म घेते

मीलन होता दोन जीवांचे

नवे रुप जन्माला येते.

निसर्गानेच दिली देणगी 

दिला मातेचा मज अधिकार

त्या चार दिवसामुळे मग का

करता करता माझा धिक्कार ?

बहिण पाठची भाऊ थोरला

दिला जगास तिने आकार

रजस्वला ती ऋतूमती ती 

तिला माझा नमस्कार 

  


Rate this content
Log in