वारा आणि बाप
वारा आणि बाप
1 min
23.8K
तू किती काही करतो आमच्यासाठी,
पण कधी काही दाखवून देत नाही,
म्हणजे तू पण तसाच आहे माझ्या बापासारखा
तो ही कधी दाखवून देत नाही.
बाप आहे तो पर्यंत मुलांना काळजी नसते कशाची
तसच तुझ नैऋत्य मोसमी रूप आहे तो पर्यंत,
बळीराजाला काळजी नाही पाऊसाची.
बाप नसल्यावर जस काही कळत नाही,
तसच उन्हाळ्यात पत्रा तापाय लागला का मग मात्र आम्हाला काही सुचत नाही.
खरं तर तुझ्याशिवाय साधं पानं ही हलू शकत नाही
तरी तुला कसलाच गर्व नाही,
तू पण तसाच आहे माझ्या बापासारखा
तो ही कधी काही दाखवून देत नाही.
