उड्डाण
उड्डाण
1 min
2
स्वप्न होते बालपणीचे
पंख फुटावे स्वप्नांना
झेप घ्यावी उंच आकाशी
हे जीवन जगताना
मनी होती एक आशा
व्हावे यशस्वी जीवनात
काय होते ईश्वराच्या मनी
पदरी पडली निराशा
मानली नाही हार कधी
उभी राहील प्रत्येक क्षणी
विरोध सर्वांचा पत्करूनी
ठेव ला ध्यास क्षणोक्षणी
