*तुझ्यासाठी*
*तुझ्यासाठी*
तुझ्याबद्दल बोलायला शब्द कधीच पुरेसे नाही
केलं पालनपोषण माझं परंंतु कुठलं वचन घेतलं नाही
फार विचार केलाय मी की,
काहीतरी लोभ असेल या नात्यात?
मिळालं उत्तर मला जे माझ्या सुुुखापलीकडे कधीच नाही.
बालपणी जेव्हा बाहेर जायचो तेव्हा चिंतेत असायची की,
केव्हा येणार? केव्हा जेवणार?
आज 25 वर्षानंतरही हीच पहीली चिंता असणार तुझी
की जसा गेला होता तसाच परत येणार की नाही?
आई.. मी स्वतःला हरवून बसलो होतो
आभासी जगात स्वतःला गुंंतवुन बसलो होतो
जगून पाहिलं! परंंतु विसरलो होतो की, जगणं काय असतं?
जेव्हा रडायचं होत तेव्हा हसायचो आणि
हसायचं होत तेव्हा रडायचो
चढ-उतार सार काही तुझ्या समक्ष आहे
माझे सर्व गुन्हे माफ,असा तुुझा अंंदाज आहे
माझा पहीला मित्र,शिक्षक, आणि विद्यार्थी तूच..
मी कधी कधी विचार करतो, तू नेमका कशाचा विचार करतेस? की,
आजही मला त्रस्त बघून एकट्यात रडतेस
आजकाल तू माझ्यावर ओरडत नाहीस कारण,
मी जोरात बोलायला जे शिकलोय
तुला बरोबर कळतं की, बेेेटा तू कितीही चूप असला
तरी लपवू शकत नाही
एक लेखक घरात जन्माला आला, थोडासा चूप तर राहणारच.
माझ्या शांततेला समजून घे जे शब्दात व्यक्त होत नाही,
आई हे सगळं तुुझ्यासाठी...
