तुझं तूच ठरव
तुझं तूच ठरव


कस जगायच मानवा तुझ तूच ठरव.
फक्त जगताने एक घास मुक्या जनावरांना पण भरव.
तुझ्या भविष्यासाठी ते पाणी जमिनीत जिरव.
कस जगायचे मानवा तुझ तूच ठरव.
झाडे तोडतोय तु पण उद्याच काय तुझ तूच ठरव.
तुला गाठायचे उंच शिखर हे मला पण कळतय.
पण तुझ्या ह्या हाव्या पोटी तो निसर्ग मात्र जळतोय.
पूर्वी कस माणसा सगळ आनंदी असायच.
पैसा नसला तरी दोन वेळचे जेवन आणि सुख पोटभर असायच.
झाडा झुडपाची जागा जर इमारतीनेच घेतली.
मग सुरू ही करावी लागेल ऑक्सिजनही विक्री.
पाणी पण आता तुला विकत घ्यायला लागलय.
कस जगायचा माणसा आता तुझ हसणं पण हरवलय.
आता काय माणसा एक नवीन विषय सुरू होतो.
एक छोटासा विषाणू माणवाचाच जीव घेतो.
त्याच्या पासून वाचायला तोड तेवढ लपवतोय.
पण निसर्गाच्या संकेतांकडे दुर्लक्ष मात्र करतोय.
कस जगायचे मानवा तुझ तूच ठरव.
निसर्गाला वाचव मग हसत मुख ऐटीत मिरव.