Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kajal Borate

Others

4.0  

Kajal Borate

Others

तुझी आठवण येते ग आई

तुझी आठवण येते ग आई

1 min
130


आई मी तुला शब्दात मांडू शकत नाही I

प्रयत्‍न करेन बोलायचा थोडाफार काही ll


तुझी आठवण येते ग आई I

भुक लागते तेव्हा जेवण वाढायला कोणीच नाई II


ही भाजी नको म्हणेपर्यंत दुसरी भाजी समोर करतेस हजर I

आत्ता सकाळी उठवायला कोणीच नसे;

लावावे लागतात मोबाईलचे गजर II


झालंच नाही मनासारखं तर तुझ्यावर चिडायची I

दिवसभराचा सगळा राग तुझ्यावरच काढायची II


पण आत्ता मात्र मी स्वत: वरच रागवते I

पॉकेटमनी पेक्षाही कमी सॅलरीत सगळे काही भागवते II


अजूनही मला नीट कपडे धुता येत नाहीत I

तू कशी काय घर सांभाळतेस काय माहित II


चूक झाली की पाठीशी घालते गं आई I

बाईचं सर्वात सुंदर रूप म्हणजे आई II


तूच शिकवलयस कशावरुनही नाही रुसायचं I

बिघडलच काहि जरी विसरुन फक्त हसायचं II


एकेकाळी होतं मी अतिलाडाचं लेकरू I

आता झालय पंख फुटलेलं स्वतंत्र पाखरू II


पण आता कोण जाणे का

सारखे सारखे पावले घराकडेच वळतात I

अन् आता मला सर्वी माणसे चुटकीसरशी कळतात II


नाव कमावण्याच्या आशेनी आणलय घरापासून दूर I

आजकाल मन होई तुझ्या भेटीस आतूर II


काय सांगू तुझी किती आठवण येते ग आई I

पण मला तुला शब्दात मांडताच येत नाई II


Rate this content
Log in