तरंग
तरंग
1 min
289
हे गणित मांडू कसे मी, लाटांच्या परतण्याचे
थेंबापरी साचल्येल्या आठवणींच्या हरपण्याचे
ऊठूनी तरंग भावनांचे, फेसाळले मनाचे किनारे
ओलांडूनी दशदिशा, भास विरणाऱ्या पावलांचे
लाटांसाेबत आठवणींच्या, प्रकाशूनी नवे अंतरंग
साेबत कधी भरती, कधी ओहाेटी, तर कधी हलकेसे तरंग
येऊदे आठवणींना वितळणाऱ्या तेजाचे रूप थाेडे
वाहूदे आता जरा काही आठवणींचे रिते ओझे
मिसळूनी श्वास नव्या स्वप्नांचा, वाहताे मी आता
लाेटण्या किनाऱ्यावरी... चांदण्या पुन्हा
