नवे-कोरे पान
नवे-कोरे पान
आयुष्यामागे धावल्याचे समाधान, स्वतःचा श्र्वासामधून जाणवेल का कधी,
की पुन्हा पळावे लागेल धाप लागेपर्यंत,
प्रवास संपण्याचे समाधान वाटावे, की कधी पुढचा टप्पा निष्फळ वाटणारा प्रसंग आठवावा,
हाच प्रवास पूर्ण करण्याचा खेद की असाही प्रवास पूर्ण केल्याचे कौतुक
रात्री नेहमी जाणवणाऱ्या अंधारात चांदण्याचे नक्षत्र नव्याने दिसावे,
आयुष्याच्या चित्रपटाचा पूर्वार्ध...
वेळ नसल्याने तीन चार वेळा फास्ट फॉरवर्ड करून जितका आठवेल तितका पुन्हा जगावा
कधी जुन्या आठवणी, एखाद्या screenshot प्रमाणे समोर याव्यात
आणि त्या भूतकाळातील स्वतः ला शोधायची धडपड सुरू व्हावी
कधी प्रश्न पडावा की काय जास्त समाधानकारक आहे,
आपल्या स्वप्नांची जाण असणे, की हाच प्रश्न स्वतः ला सतत विचारणे...
शाळा कॉलेज नी लहानपणीची अफाट स्वप्ने,स्वप्ने ज्यांना काही मर्यादा माहीत नव्हत्या,
स्वप्ने जी फक्त इच्छाशक्ती, जिज्ञासा आणि निरागस प्रामाणिकपणा यांच्या जोरावर जग जिंकू शकत होती
काय जास्त सुंदर आहे,सकाळी शाळेला उशीर होऊनही,
पटांगणात राष्ट्रगीत सुरू झाल्यावर निरागस निष्ठेने आहे त्या ठिकाणी
स्तब्ध उभे राहणे,प्रजासत्ताक नी स्वातंत्र्य दिनादिवाशी,
लहानसा झेंडा, गगनात सामावणार नाही इ
तक्या अभिमानाने शर्टाच्या खिशावर लावणे कि कधी थिएटरमधे जाणते अजाणतेपणी राष्ट्रगीतासाठी उभे राहणे,शब्द लक्षात आहेत आजही, कदाचित.....
शाळा सुटल्यावर सगळे जग जिकंल्याच्या आविर्भावात असणारे विद्यार्थी,
पुढे कामावरून घरी जाताना गप्पा मारत, गाणी ऐकत त्याच आविर्भावात परततात,
फक्त कधी निर्जीव भावनाशून्य थांबेही लागतात....बहुदा
शाळेच्या सहलीची बस किंवा गावाला जाणाऱ्या S.T मधील विंडो सीट ची क्रेझ,
आजकाल लोकल नी बेस्ट बस मधे जागा मिळणाऱ्या समधानापूर्तीच असते बहुदा...
साऱ्या लहानग्यांसाठी मात्र ती अजुनही तशीच आहे...
एवढ्या सगळ्यात अपवाद म्हणून पालक नी मित्र आहेतच ,
Keyboards वर इंग्रजी टाइप करुन, शाळेतल्या दीवाळी
गृहपाठातील निबंधाची कधी आठवण होते ?
नव्या कोऱ्या वहीतले पहिले पान जितक्या जमेल तितक्या चांगल्या अक्षरात काढण्याचा आपण का प्रयत्न करतो?
कदाचीत ती वही कोरी असन्याची उत्सुकता जास्त असते,
भीतीला तर कुठे वावच नसतो, रितेपनासाठी...
हीच उत्सुकता प्रत्येक दिवसात जेव्हा सापडेल,
एखाद्या नव्या कोऱ्या पानाप्रमाने,तेव्हा तीच अफाट स्वप्ने, इच्छाशक्ति, प्रामाणिकपणा नी गगनात न मावनारा अभिमान,शोधन्याची, जगन्याची, जाणण्याची दिशा देईल....