तो आणि त्याला आवडणारा पाऊस...
तो आणि त्याला आवडणारा पाऊस...
खुप नशीबवान आहेस पाऊस तू, त्याला तू आवडतोस.
कारण त्याच्या कोरड्या मनाला फक्त तूच ओलं करतो.
खुप नशीबवान आहेस पाऊस तू, त्याला तू आवडतोस.
कारण सर्वांपासुन अलिप्त असलेल्या त्याला तूच जवळचा वाटतो.
खुप नशीबवान आहेस पाऊस तू, त्याला तू आवडतोस.
कारण कधी दुःखी असलेला तो फक्त तुझ्याच प्रत्येक थेंबात सुखावतो.
खुप नशीबवान आहेस पाऊस तू, त्याला तू आवडतोस.
कारण नेहमी कठोर आणि हातचं प्रेम राखून वागणारा तो, तुझ्यावर मात्र भरभरुन प्रेम करतो.
खुप नशीबवान आहेस पाऊस तू, त्याला फक्त तूच आवडतोस.