ती
ती
नकळत आली ध्यानी मनी नसताना ती,
न् क्षणभर पाहातच राहिलो मी....||
नकळत लाजुन गालात खुदकन हसली ती,
हसत हसत तिच्यात रमून गेलो मी....||
बघता बघता हळूच लपून गेली ती,
पाणावलेल्या डोळ्यांनी शोधतच राहीलो मी....||
हसता हसता हळूच बोल्ली ती,
न कळत तिच्या ऐकतच राहीलो मी....
जेव्हा पाहतो वळूनी तिजकडे परत मी,
कळलेच नाही केव्हा प्रेमात पडलो तिच्या मी....||
बोलता बोलता हळूच बोलून गेली ती,
नाही मी तुझी ना तु माझा...
तरीही तिचे न माझे स्वप्न रंगवत गेलो मी....||
अकस्मात अचानक निघुनी गेली ती,
न् नुसता पाहातच राहीलो मी....||
वाटले होते पुन्हा एकदा भेटेल ती,
त्या क्षणाची आजही वाट पाहतो मी....||
माझीया प्रियेला प्रीत कळेना,
न् तिच्याशिवाय माझे मन राहवेना...||
काय होते न् काय झाले या मनाचे,
आजही त्याचे उत्तर शोधतो मी....||
आठवणीचे ओझे देउन गेली ती,
हसून थोडे ओझे विसरून जातो मी...||
अरे वेड्या मना नाही येणार तुज कडे परत ती,
पण आजही तिजवरच प्रेम करीतो मी.....||
