आज पुन्हा एकदा जगावंसं वाटतयं
आज पुन्हा एकदा जगावंसं वाटतयं
आज पुन्हा एकदा जगावंसं वाटतंय,
या निसर्गाच्या सान्निध्यात परत एकदा रमावंसं वाटतंय... ||
आयुष्यात बालपण परत एकदा यावंसं वाटतंय,
लहान होऊन मोठीपणीचे स्वप्न बघावसं वाटतंय…||
Chocolate आणि Biscuit परत एकदा खावंसं वाटतंय,
आज पुन्हा एकदा तसं जगावसं वाटतय…||
शाळेत परत एकदा जावसं वाटतंय,
खोड्या करून आई-बाबाचा मार खावसं वाटतंय...||
लहानपणीचे खेळ परत एकदा खेळावंसं वाटतंय,
आज पुन्हा एकदा तसं जगावसं वाटतंय…||
कॉलेज च्या मित्रांसोबत मजा करावीशी वाटतंय
तिचे स्वप्न परत एकदा पहावंसं वाटतंय... ||
कधीतरी ती भेटेल असं मनातल्या मनात वाटतंय,
आज पुन्हा एकदा तसं जगावसं वाटतंय…||
या काळ्या निळ्या आभाळाकडे पाहून वेगवेगळी चेहरे करावीशी वाटतंय,
पाऊसाचा एक थेंब हळूच प्यावसं वाटतंय... ||
रस्त्यावर साचलेल्या पाण्यात जोरदार उडी मारावसं वाटतंय,
आज पुन्हा एकदा तसं जगावसं वाटतंय…||
धावपळीच्या या जगात निवांत एका ठिकाणी बसावसं वाटतंय,
थकलेल्या या जीवाला थोडासा आराम घ्यावासा वाटतंय... ||
विचारांचे डोंगर पाडावसं वाटतंय,
मोठेपणाची हि दुनिया नकोशी वाटतंय...||
आज पुन्हा एकदा लहान बाळ व्हावसं वाटतंय…||
