STORYMIRROR

Avantika Dhenge

Others

3  

Avantika Dhenge

Others

ते एक पत्र

ते एक पत्र

1 min
294

लाकडांनी पेट घेतला, ज्वाळा धडाडून निघाल्या

त्या सोनेरी ज्वाळां सोबत, अनेकांचा आक्रोश तेथे दुमदुमला

बऱ्याच अडचणी आल्या, नि तशाच निघुन गेल्या

मात्र त्या शूराच्या स्मृती, अश्रूंच्या थारोळ्यात धुमसत राहिल्या

त्या रुबाबदार खाकीच्या उबे मध्ये, आज मात्र एक पत्र सापडले

कुतुहलाने तिने त्याचे पहिले पान उघडुन बघितले


त्यात प्रथम लिहिले होते

माझ्या प्रिय सखे,

उघडशिल जेव्हा पत्र तु, या जगात नसणार मी

नेहमी प्रमाणे लाल शालुच्या, केवळ स्पर्शात असणार मी 

तुझा मी रडण्याचा अधिकार मागवून घेणार नाही, तुझ्या सगळ्या तक्रारींना मी कधी नकार देणार नाही

प्रिये , तुझ्यासाठी माझे प्रेम अबाधित राहणारच आहे, पण त्या पेक्षा जास्ती प्रेम मी मातृभुमीवर करणार आहे

आज मी तुला माझ्या सात वचनातून मुक्त करतो आहे, तुझ्याकडून केवळ मी एका वचनाची अपेक्षा करतो आहे

माझ्या बाळाला मोठे होऊन माझ्याच वळणावर जाऊ दे, त्याला देखिल मातृभुमीच्या मायेची ऊब मिळू दे

सैनिक होऊन जगण्याचे भाग्य त्यालासुद्धा मिळू दे


आणखी काय ? 

केवळ एवढंच माझ्यासाठी करून दे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Avantika Dhenge