तारुण्याच्या उंबरठ्यावर ...
तारुण्याच्या उंबरठ्यावर ...
1 min
784
तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना
भान नसते आपले, आपल्या माणसांना
कळत-नकळतं चुका घडतचं जातात
अन् सुधारण्याचा संध्या मात्र निसटून जातात..
तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना
विसरली जातात नाती यश मिळवताना
अपयश आले की दुःख करतो
पण दुसरा मार्ग शोधायचा विसरूनच जातो..
तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना
विसरु नये कधीही कोणाच्याही उपचारांना
परतफेड करावी न दुखावता भावनांना
आशिर्वाद घ्यावेत नेहमी आनंदी असताना..
तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना
मान झुकली पाहिजे गुरुंसमोर असताना
तारुण्याच्या जोशात विसरू नये माता-पित्यांना
कारण त्यांचाच आधार असतो जगता मरताना!
