STORYMIRROR

Akshata Subhedar

Others

4  

Akshata Subhedar

Others

परीक्षा

परीक्षा

1 min
501

आज उद्याचे ना जाणिले भीती वाटे मज त्या दिवसाची,

सुरू होऊनी कधी संपणार आस लागली परीक्षेची..


अभ्यास करूनी थकले आता, नाही जाणवत तो उत्साह 

मजा मस्ती आनंद विसरा मनात पेटला दाह..


चिंता-काळजी-शंका-हुरहूर मन वेढिले या सर्वांनी,

वाटे दोन मिनिटे शांत बसावे चिंतेतून मुक्त होऊनी..


वेगळे विषय वेगळे प्रश्न विचारांनी मांडले थैमान, 

सवड ना जराही मिळे सुट्टी पडूनही छान.. 


काय करावे सुचत नाही भय राहते मनात,

तेवढ्यात बातमी येते कुठून परीक्षा आली दारात..


अपेक्षा पूर्ण करताना सर्वांच्या, स्वतःच्या इच्छा मात्र विसरून जातो,

आणि या सर्वांच्या भितीमुळे पेपर मात्र कठिणच जातो!


Rate this content
Log in