STORYMIRROR

Mahesh Ghule

Others

3  

Mahesh Ghule

Others

स्वप्न डोळ्यात तेवत

स्वप्न डोळ्यात तेवत

1 min
155

स्वप्न डोळ्यात तेवत

आजही मी झोप ती टाळतो आहे!


नको मिटुस पापण्या अलवार

अबोल त्यातिल काही वाचायचे राहिले आहे!


नको म्हणुस पळपुटेपणा

मन रिझवण्याचे छंद काही नवे जोपासले आहे!


नशीबाच्या पुढे काही नसत,

पण म्हटल थोडे मागे जाऊन पहायचे आहे!


आठवणी अशाच थोड्या

बस डोळ्यात पाणी अजुनही स्थिरावले आहे!


द्वंद मनाचे असे

रोजच नव्याने हरायचे आहे!


उणे दुणे न पहावे

चुका माझ्याच पदरी प्रायश्चितं आहे!


झरा खळखळावा

तसेच माझे वाहणे सुरुच आहे!


डोळ्यात स्वप्ने तेवत

आजही मी झोप टाळतो आहे!


Rate this content
Log in