Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mahesh Ghule

Others

3  

Mahesh Ghule

Others

पुन्हा पाऊस आला

पुन्हा पाऊस आला

5 mins
682


पुन्हा पाऊस आला...!!

तसा मला पाऊस आवडतच नव्हता..!

पण तु आलीस अन, त्या ओल्या चिंब सरितल्या,

उबदार स्पर्शाचा अनुभव मलाही घ्यावासा वाटला.

तु म्हणायचिस "नालायका कविता करतोस ना..?

मग पाऊस नाही आवडत?"

तसं तुझ्या त्या निरर्थक प्रश्नाला मला तिथच फटकरावासं वाटायचं,

पण आत कुठेतरी समाधान असायचं.

वाळवंटाला नुसत्या पावसाळी ढगांचा आभासही पुरेसा असतो,

अगदी तसच शहारुन यायचं मला.

तुझ्या त्या क्षणिक अस्तित्वाची झुळुक तशी मला फार आधीच जाणवत होती,

म्हणुन तर कधी कधी वैतागुन मी म्हणायचो,

"तु काय माझी आयुष्यभराची मैत्रीण नाही राहणार..!!"

तेव्हा तुही माझ्यावर उखडायचीस,

जितकं मी स्वताला त्रासवुन घेत होतो अगदी तितकचं !

तसे आपण किती पावसाळे एकमेंकाबरोबर अनुभवलेत..?

या प्रश्नाच उत्तर खरंतर शुन्यच यायला हवं होत,

पण येणार्‍या प्रत्येक पावसात आपण एकमेंकाचं चिंब अस्तित्व अनुभवायचो.

तुझं मात्र जरा जास्तच bold..!!

दिवसागणिक दिवस मागे पडु लागले,

कितीक उन्हाळे आपण त्या एकमेंकांच्या गुढ अस्तित्वाने,

पावसासारखे ओलेचिंब अनुभवत होतो,

पण प्रत्येकवेळी तो पहिलाच पाऊस वाटायचा.!

तुझं ते पावसात भिजणारं चिंब रुप मी कधी पाहुच शकलो नाही,

असचं काहीसं मी दाखवयाचा प्रयत्न करायचो.

पण खरं सांगु , तुझं ते चिंब रुप अनुभवायला ,

पाऊस म्हणुन मीच तर यायचो.

किती अल्लड होतीस तु..? माझ्या त्या चैत्यन्याच्या पावसात,

किती लाडिक होऊन भिजत राहायचिस..!

मी मात्र त्या अळवावरच्या पाण्यासारखं तुझ्या जवळ राहुन,

दुर असण्याचा "तो" आव आणायचो.

वाटायचं मीही व्हावं स्वच्छंदी अन त्या पावसाच्या सरीलाही लाजवेल,

असंच काहीसं बरसावं तुझ्या आयुष्यात.

पण तुला तो माझा झंझावात सोसावलाच नसता..!

मग मीही थोडा(!) बिथरायचो..

अन कधीही हार न मानणारा मी "त्या" पावसाच्या पुढं

सपशेल हार पत्करायचो.

आठवतयं मी म्हणायचो, "हरलोय रे मी.. फक्त तुझ्याकडुन..!" 

तुला मात्र मी कधीच त्यातली आर्तता दिसु नाही दिली.

माहीत नाही का..? पण एव्हढं मात्र नक्की..! मी काहीतरी ठरवलं होतं.

अन त्याचसाठी माझं ते अळवासारखं राहणं होतं.

तुला मात्र मी किती खिजवायचो तुझ्या मनासारख तु वागावसं म्हणुन,

तुझं ते जीव लावणं, मला खुपच संभ्रमात टाकायचं,

अगदी तितकच जित़क माझं "ते" गुढ वागणं तुला संभ्रमात टाकायचं.

माझं तुला ते म्हणणं "माग ..!! हवं ते माग..!! दिलं..!!"

अन तुझं ते लाडिक हसत मला विचारणं,

"काय मागु तुझ्याकडे..? तु आहेस यातच सगळं आलं.. आणखी काय मागु..?"

माझं ही ते तुला हटकणं,

"का लावतेस इतका जीव..? नाही मला याची सवय."

तुही माझं ते बोलणं किती मनाला लावुन घ्यायचीस,

मला समजावता समजावता तु मात्र किती वाहवत जायचिस.

तुझं तुलाही कधी उमजलच नाही.

तुझ्या त्या जीव लावण्याला मी खरच खुप वैतागलो होतो गं.!

म्हणुन तर कुठंतरी दुर निघुन जाण्याची तयारीच मी करत होतो.

पण तेव्हा मला आठवत होता तुझा तो स्वप्नाळु चेहरा अन ती भिरभिरणारी नजर.!

तसं मला कुठल्याच चौकटीत रहायला नाही आवडायचं,

पण तु मात्र माझ्यासाठी किती सहजतने एक चौकट बनवलीस.

नाहीच जमलं मला ती चौकट तोडायला,

मीही कशी तोडणार होतो ती चौकट.!

तसं तुझ्या आयुष्यात दोघंच पुरुष,

एक तुझे पप्पा अन दुसरा..?

दुसरा तुझा तो एकमेव सखा.. तुझा कृष्णा.!

मला थांबवण्यासाठी तु मात्र तुझ्या एकमेव सख्याची चौकटच माझ्या अस्तित्वाला दिलीस,

म्हणालीस "तु माझा दृष्य स्वरुपातला कृष्णाच आहेस..! मला फक्त तु अन पप्पा दोघच हवेत..! बाकी कुणीच नको..!"

तुला मात्र नाही जाणवली माझ्या त्या अलिप्त हृदयात चाललेली चलबिचल.

मनाची तेव्हा ती दोन रुपं मलाच छळु लागली,

एक मात्र खुपच खुष.! त्याला जे हवं ते त्यानं करुन दाखवलं म्हणुन.!

अन दुसरं.. दुसरं मात्र खुपच छिन्न-विछिन्न.!

येणार्‍या वादळाची भिती मला कधीच नाही वाटायची..!

पण माझं तुझ्या आयुष्यातुन जाणं त्या वादळासारखं मला नको होतं.

जाणार तर मी नक्कीच होतो, पण त्या ओहोटीच्या लाटेसारखं रिकामं.!

तु मात्र त्या लाटेतली तीव्रता जाणवुन सुद्धा म्हणायचिस,

"ती ओहोटीची लाटसुध्दा तितकीच वाईट असते रे.!

किनार्‍यावरच्या सार्‍याच गोष्टी आपल्या बरोबर नेते...!"

अन मला पटकन जाणवल तुझं ते माझ्याबरोबर वाहावत जाणं.

मी मात्र माझ्या मतावर ठाम होतो,

म्हणुन तर तुला तेव्हा लगेचच उत्तर दिलं.

"ती लाट किनारा तर नाही नेणार ना..??"

तु मात्र माझ्या या आढ्यावेढ्यातुनही

मला काय समजावयाचय ते समजुन जायचीस.

तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी माझं म्हणुन पाहिलं,

तुला जे जे वाटलं ते ते मी करुन दाखवायचो.

मी हे का करतोय याचं उत्तर माझ्याकडे होतं..!

तुझ्याकडे माझ्यासारखे कितीतरी मित्र..!

अन माझ्याकडे फक्त तु..!

माझी एकुलती एक मैत्रीण..!

मग कुठं बिघडल मी तुला जे वाटतं तेच जगलो तर..?

तु मात्र हा प्रश्न कधीच मला विचारु शकली नसतीस..!

पण तु व्यक्त होण्यासाठी शब्दातुनच बोलावं..

असं माझ्यासाठी मुळीच काही नव्हतं..!

बसं तु फक्त मनात आणायची देरी असायची..!

म्हणुनच तर मी म्हणायचो "मला काय वाटावं यावर तुझा control आहे..!

पण तुला काय वाटतं यावर..?"

तुलाही मग जाणवायचं..

माझा तो सुक्ष्म वावर तुझ्या त्या अव्यक्त स्वप्नातला..!

आता तु खुप सुखात होतीस..!!

तुला जसं हवं तसं सारं घडायला लागलं होतं..!

पण "माझा कृष्णा" माझ्या आयुष्यातुन निघुन तर नाही जाणार..?

हीच काळजी तुला रात्र अन दिन छळत होती..!

पण तुझी कधीच हिम्मत झाली नसती मला थांबवायची.

मला ते सारं कळत होतं,

तु व्यक्त व्हावीस म्हणुन तर मग मी तुला विचारलं..

"थांबशील माझ्या आयुष्यात तु..? कायमची..!!"

तु मात्र आवकच झाली होतीस..

जेव्हा मी तुला हे विचारलं तेव्हा..!!

पण तु मात्र माझं ते विचलित मन जाणलं नाहीस का गं..?

किती सहजतेने म्हणालीस

"सांग मी काय करु..? माझा एक best friend ,more than friend झालाय..? सांग मी काय करु..?"

आता मात्र माझ्या परिक्षेची घडीच होती.

म्हणून मी तुला विचारलं "उत्तर कोणाकडुन हवय..?"

अन तु जसं काही झालच नाही इतक्या आविर्भावात उत्तरलीस!

"मला माझ्या true friend कडुन उत्तर हवय..?"

"TRUE FRIEND..?" आज मात्र मी त्याला हरवायचं ठरवलं होतं..!

माझा तो ठिकर्‍या ठिकर्‍या झालेला अहंपणा मी आज तुकड्या तुकड्यात वेचत होतो..!

बसं माझ्यापुढं तुझा first hero जिंकावा म्हणुन..!

माझा मी पहिला मनाविरुध्द घेतलेला निर्णय..!

ज्यानं आजवर फक्त त्याला जे वाटतं तेच जिणं जगला तो..

तुझ्यासाठी फक्त माझ्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी..

माझं ते क्षणिक अस्तित्व पुसायला तयार झालो..!

तुला तसच तरंगत ठेवत मी फक्त म्हणालो..

"नको येऊस त्या चौकटीच्या बाहेर..

आपल्या पप्पांना काय वाटतं ते महत्वाचय..! I respect your papaa..!"

अन तुही हलकेच ते ओघळते अश्रु पुसत म्हणालीस

"I PROUD OF YOU.. मनापासुन..!"

काय हवं होतं मला अजुन..?

कुणाच्या तरी आयुष्यातला कृष्णा होणं..

अन कुणी तरी माझ्यासाठी म्हणणं..

"I proud of you..!!"

पण तुझा तो प्रश्न " का आलास माझ्या आयुष्यात..? का..?"

किती छळतो आजवर तो मला..!!

अन मी तुलाही तुला पटेल असच उत्तर द्यायचो..!!

"तुझ्या अश्रुंमागची हजार कारणे शोधायला..!"

पण तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला माझ्या किती अश्रुंना

त्या डोळ्यांच्या इवल्याश्या पेटीत कायमचं कोंडावं लागलं होतं..!

ते कधीच तुला जाणावलं नाही..!

म्हणुन तर कधी कधी मी तुला taunt द्यायचो..!

"मला ओऴखणारी एकमेव तुच आहेस.. पण तु मला ०.०१% ही ओळखत नाहीस..!!

ते मात्र मी तुला उमजु देत नाही म्हणुन..!"

आज मात्र मी सारं संपवलं होतं..

प्रत्येक प्रश्नाच्या पुढचं प्रश्नचिन्ह आज मी काढुन घेतलं होतं,

पण उत्तरं मात्र तुलाच शोधायला लावली होती..!

बसं त्या शेवटच्या भेटीत डोळ्यावर Ray-Ban त्याचसाठीतर होता..!

ते दुंभगलेलं वागणं तुला आजही नाही समजलं,

पण एक सांगु ते माझं दुभंगलेलं वागणं व्दंद होतं.

तुझ्या true friend अन माझ्या अहंपणामधलं..!

ज्यात मला जिंकायचं होतं..!

माहीत नाही आज मी जिंकलो की नाही..!

तो TRUE FRIEND हरला की नाही..!

बस्सं एव्हढं मात्र नक्की..!

मी तुझ्या first hero ला हरु दिलं नाही..!

आज मी तुझ्यासाठी कितीही वाईट झालो तरी,

मला मात्र एकच समाधान राहिल..!

मी तुझ्या पप्पांना हरवलं नाही.

फक्त तु म्हणाली होतीस म्हणून,

" yes I agree तु माझे कुठलेही decision

अगदी सहज बदलु शकतोस.. पण मला वाटतं तु ते बदलु नयेस !"

मी हरलो ते यासाठी म्हणायचो रे.,,!

दगड..! इतकं नाही कारे उमजलं तुला..?

मी तुझा true friend होतो..!

पण तु त्याला तुझा कृष्णा बनवलसं..! का..?

त्या कृष्णाइतकंच अफाट दुख सहन करायला..?

आज तुझ्याकडे तुला माझ्याविषयी असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल.

मला खात्री आहे तु मला कधीच नाही विसरणार..!

तुझा एकमेव सखा म्हणुन..! तुझा कृष्णा म्हणुन..!

परवा असच खिडकीतुन बाहेर डोकावत होतो..

पाऊस पडत होता.. पण आज तु माझ्या अस्तित्वाशिवाय

त्याच्या त्या ओलसर सरी झेलत असशील म्हणुन मलाही ते सार सारं आठवलं.

अगदी काल परवा घडल्यासारखं.

अगदी तुला जसं आठवलं तेव्ह्ढचं स्पष्ट.

पुन्हा पाऊस आला..

अन् सार्‍या आठवणी ताज्या झाल्या अन laptop वर या ओळी अपोआपच उठत गेल्या...


Rate this content
Log in