STORYMIRROR

स्वाती किरवे

Others

2  

स्वाती किरवे

Others

स्वच्छ भारत

स्वच्छ भारत

1 min
15.5K


उठा उठा घेवू चला स्वच्छतेची आण

स्वच्छतेची आण घेवू स्वच्छतेची आण

हाता हातात झाडू घेवूनी

स्वच्छ करु या गाव मिळूनी

करू सगळे, स्वच्छ सगळे

संपू या घाण ,स्वच्छतेची आण

घेवू स्वच्छतेची आण.

गाडगेबाबाची शिकवण घेवू या

स्वच्छता हा मंत्र सारे जपूया

सर्वां संगे ,वाढवू चला

भारताची शान, स्वच्छतेची आण

घेवू स्वच्छतेची आण

स्वच्छता ही सगळीकडे सर्व ठेवू या

स्वच्छ स्वच्छ राहताना

निरोगी होवू या

ध्यास धरू, पूर्ण करू

देशाचं मिशन, स्वच्छतेची आण.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from स्वाती किरवे