STORYMIRROR

Madhuri Kakade

Others

3  

Madhuri Kakade

Others

सुंदर नातं

सुंदर नातं

1 min
238

सुंदर नातं

  बहरास येते

  असे की जसे ते

ओवी नि जातं !


सहवासाचे

  मोरपंखी क्षण

  एकांती स्मरण

प्रियकराचे.


हातात हात 

  स्पर्श तो सुखावे

  अमृतात न्हावे

दिवस रात.


ऋणानुबंध

  धागे रेशमाचे

  जुई मोगऱ्याचे

जीवनी गंध 


वस्त्र हे छान

  त्यागाची झालर

  हृदयी सुंदर

पिंपळपान !


Rate this content
Log in