सुकलेलं पान
सुकलेलं पान
1 min
239
झाडावरचं एक सुकलेलं पान
आज उद्या जमिनीवर पडणार होतं
सर्वांना गार सावली देणारं
स्वतः उन्हात पडणार होतं || 1 ||
झाडाच्या आयुष्यात तसं हे
नेहमी घडणारं होतं
एवढ्याशा पाणावाचून त्याचं
कोठे अडणार होतं || 2 ||
हे जीवन म्हणजे
आहे एक झाड
आपण आहोत साधं पान
अडतं नसतं कोणाचे कोणावाचून
ठेवा जरा याचे भान || 3 ||
