सत्य आणि असत्य
सत्य आणि असत्य
1 min
694
सत्य आणि असत्य फरक एक अक्षराचा
दोघा मध्ये असतो उभा दावा जन्माचा !!
हेच एक अक्षर असत्याचा भाव वाढवते
सत्याच्या पुढे सारखे पळत सुटते
असत्यावर विश्वास चटकन ठेवतात
सत्यासाठी मात्र करावी लागते यातायात !!
ससा कासवाच्या शर्यती प्रमाणे
शेवटी होतो विजय सत्याचा
पण हे कळण्यास शेवट येतो आयुष्याचा
राम बोलो राम ऐकल्यावर असत्य स्तब्ध होते
राम नाम सत्य है हे शेवटी खरे ठरते !!
