स्पेस
स्पेस
1 min
112
स्पेस,स्पेस,स्पेस
कशाला हवीय स्पेस,
उगमापासून जन्मापर्यंत,
बालपणापासून तारुण्यापर्यंत,
प्रत्येक वाटेवर होती स्पेस,
तरीही आता ....कशाला हवीय स्पेस.
शिक्षण घेताना होती टक्केवारीमधील स्पेस,
करिअर घडविताना होती दोन कोर्स मधील स्पेस,
Interview साठी सुद्धा होती, त्याच्यात आणि माझ्यात स्पेस,
तरीही आता ...कशाला हवीय स्पेस.
दोन मित्रांमधील स्पेस,
दोन नात्यांमधील स्पेस,
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर फक्त पाहत आलोय स्पेस आणि स्पेस.
तरीही आता .....कशाला हवीय स्पेस.
अशा या स्पेसरूपी जाळ्यातून बाहेर पडतो न पडतो तोच,
ती म्हणते मला हवीय स्पेस,मला हवीय स्पेस.
पण खरं सांगा मित्रांनो,
प्रेमाने भरलेल्या या नात्यात,
खरंच हवी आहे का स्पेस?
खरंच हवी आहे का स्पेस?