STORYMIRROR

Ashwin Chavaha

Others

3  

Ashwin Chavaha

Others

" संसार "

" संसार "

1 min
332


एकदा संसार

थाटशील का प्रिये

मोडका तोडका

असेना पण तुझं माझं

भावविश्व सजवणारा ,


त्या संसाराला बंधनाच्या

भिंती नसतीलं

संशयाच छत नसेलं

असेल फक्त तुझं माझ्या करता

माझं तुझ्या करता आसमंता परी प्रेम ,


तु हसतेस माझ्या बोलण्यावर

हस बये हस पण जेंव्हा

वास्तविकता तुझ्या

समोर असेल तेंव्हा मात्र

मला मिठीत घेतल्या शिवाय

तुला राहवणार नाही ,


तु मनात म्हणत असशीलं

संसार चालवायला फक्त प्रेम

अपुरं पडत वेड्या त्या संसाराला

पैशाची चाकही लागतात ,


ज्या बाहुत विरघळल्यावर

तुला हायसं वाटतं कदाचित्

तु दुर्लक्षीत केल त्या हातांना

जे तुझ्या पाठीवर फिरतात

ते तुला हेच सांगतात

तु निश्चिंत राहा प्रिये निश्चिंत रहा ,


मग संसार थाटशीलं का

प्रिये मोडका तोडका असेना

पण तुझं माझं भावविश्व

सजवणारा ....


Rate this content
Log in

More marathi poem from Ashwin Chavaha