समाधान
समाधान
1 min
31
क्षण एक आनंदाचा
मनमुराद जगून घ्यावा
तो कोणासाठी थांबत नाही
त्याच वेळी त्याचा आनंद लुटावा...१
दुसऱ्यांचा हेवा करण्यापेक्षा
आपला आनंद आपण शोधावा
इतरांच्या सुखातच सुख
मानून गंध सौख्याचा दरवळावा...२
समाधान हे मानण्यावर असते
याचा विसर न व्हावा
क्षणिक सुखाच्या पाठीमागे न धावता
आपला वेळ सत्कारणी लावावा...३
मीपणा मिरवण्यात
काही नसतो अर्थ
सर्वांच्या सुखदुःखात सामील व्हावे
नाहीतर सर्वच व्यर्थ...४
क्षण एक आनंदाचा
प्रत्येकाला वाटावा
जगण्याचा सोपा मार्ग
हा प्रत्येकाला अवगत व्हावा...५
