नमन
नमन
1 min
30
पहिले नमन माझे
माझ्या आई-वडिलांना
त्यांच्यामुळे दिसले हे जग
खतपाणी घातले संस्कारांना...१
दुसरे नमन माझे
सावित्रीच्या ज्योतीला
त्यांच्यामुळे लाभे
शिक्षणाचा गंध आयुष्याला...२
तिसरे नमन माझे
माझ्या सर्व शिक्षकांना
ज्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशामुळे
वाव मिळाला गुणांना...३
चौथे नमन माझे
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन् यांना
एका शिक्षकाने घडविला इतिहास
राष्ट्रपती होण्याचा बाणा...४
पाचवे नमन माझे
माझ्या सहवासात आलेल्या
सर्व लहान थोर मंडळींना
ज्यांच्याकडून काही गोष्टी मी शिकल्या...५
सहावे नमन माझे
जीवनात आलेल्या अनुभवाने
मला शहाणे अन् खंबीर बनविले
त्या सर्वांचे आभार शिक्षक दिनाच्या निमित्ताने..६
