STORYMIRROR

मंगेश वंजारी

Others

3  

मंगेश वंजारी

Others

सखा

सखा

1 min
526

तू बोलतोस म्हणून

आजकाल आरशात 

जरा जास्तच वेळ रेंगाळते 


केसांच्या बटा वगैरे काढून

स्वतःच स्वतःवर हसते

गजरे वगैरे लावावे वाटतात रे 

पण बाजारात जायची भिती वाटते


पायातली जोडवी

गळ्यातील मंगळसूत्र

आड येतात रे सारी 

नैतिकतेची कुंपणे 

तरीही आजकाल मी

स्वतःच्या रुपावर भलतेच प्रेम करते

तू बोलतोस म्हणून

आजकाल आरशात 

जरा जास्तच वेळ रेंगाळते


अगदी तुला हवी तशीच

दिवसभर घरभर

छानशी नटूनथटून वावरते

रेडिओवर मस्त गाणी एकते

जणु नववधु प्रिया मी लाजते 

तू बोलतोस म्हणून

आजकाल आरशात 

जरा जास्तच वेळ रेंगाळते 


लाजून एक गिरकी घेणार

इतक्यात हातावर गोंदलेली

मालकी हक्काची निषाणी

मला भानावर आणते 

मग सावरून घेते स्वतःला

आवरुन मनाचा पसारा

रटाळवान्या संसारात

तेवढाच रे तुझ्या प्रेमाचा विरंगुळा

तू बोलतोस म्हणून

आजकाल आरशात 

जरा जास्तच वेळ रेंगाळते 


Rate this content
Log in

More marathi poem from मंगेश वंजारी