STORYMIRROR

Ashwini Hipparge

Others

3  

Ashwini Hipparge

Others

शेतकरी

शेतकरी

1 min
11.5K

शेतकरी राजा हा दिवस रात्र कष्ट करत असतो, 

त्याला आठवड्यातून एकदा ही सुट्टी नसते..... 


आता या कोरोनाच्या महामारी मुळे, 

सगळ्या शाळा, कॉलेज, उदयोगधंदे बंद आहेत, 

पण आपला शेतकरी राजा हा राबराब राहतो आहे....... 


सगळे बंद असले तरी चालेल पण, 

शेती व्यवसाय बंद पडला ना तर संपूर्ण देशाची स्तिथी ढासळते....... 


आपला शेतकरी राजा हा पावसाळा येण्याची वाट पाहत असतो, 

एकदा का पाऊस पडला तर शेतकर्यांची मन आनंदाने भरून येतो........ 


कधी दुष्काळ असतो तर कधी सुकाळ, 

वर्षानुवर्षे आपला शेतकरी राजा हा कष्ट करतच असतो..... 


आपल्या मालाला चांगला भाव मिळावा या आशेत तो असतो, 

आपली सुद्धा मुले मोठ्या पदावर नोकरी करावं म्हणून तो, 

दिवस रात्र कष्ट करून मुलाला शिकवत असतो...... 


देवाने मानवी जीवन निर्माण करताना, 

माणसाला अनुकूल अशी निसर्ग रम्य परिसर निर्माण केलयं, 

पण या निसर्गाला सांभाळण्यासाठी कदाचित तो

शेतकरी राजाला निर्माण केला असावा....... 


खरचं या शेतकरी राजाला माझा सलाम


Rate this content
Log in

More marathi poem from Ashwini Hipparge