शब्द साहित्याचे
शब्द साहित्याचे


एकदा शब्द पडले
साहित्यावर भारी,
अहो, साहित्य महाशय
कुठे निघाली स्वारी?
साहित्य म्हणाले,
माझ्याशिवाय होणार का
तुमची कायापालट सारी?
साहित्याला बोचला
शब्दाचा मार
शब्दांशिवाय आपण
कसे होऊ तयार?
साहित्याला मात्र आपली
चुक कळणार
'शब्द' हाच आहे
आपला खरा अलंकार.
साहित्याचा मात्र आता
गळून पडला अहंकार
शब्दांशिवाय साहित्य,
साहित्याशिवाय शब्द,
दोघेही एका मायेचे लेकर.
दोघांची मैत्री अपार
म्हणून सदैव आपुल्या पाठीशी
शब्दसाहित्याचे चांगले विचार
चांगले विचार