STORYMIRROR

Sarika BagalGade

Others

4  

Sarika BagalGade

Others

सगळच आपल नसत......

सगळच आपल नसत......

1 min
873

आयुष्यात सगळच आपल नसत

जे नको आपल्याला तेच मिळत असत

त्यातच सुख, समाधान मानायच असत

कारण, आयुष्यात सगळच आपल नसत....


जे हवे तेच जर मिळालं असत

तर माणसाला त्याचे महत्त्व समजल नसत

स्वप्न इथ प्रत्येकाचे अनेक

त्याच्या पूर्णत्वासाठी नको पैशाचे चेक

जिद्द व चिकाटी हाच त्यावर मार्ग एक

खरंच, आयुष्यात सगळ आपल नसत....


खूप काही जवळून अलगद जात

पण, आपल त्याकडे लक्षच नसतं

मन कोठे तरी दुखावत

मिळाले की आनंदाने सुखावत

बघा ना, आयुष्यात सगळच आपल नसत....


सुखाची भूक सगळ्यांनाच लागते

त्याच्या येण्याने मनाची तहान भागते

त्याला मिळवण्यासाठी लागते

             सकारात्मक ऊर्जा

पण, नकारात्मकता आली तसे सगळ

             भस्म करते सौर ऊर्जा

म्हणून, आयुष्यात सगळच आपल नसत.....


जे आपल तेच आपल्याला मिळत असत

दुसऱ्यांच उगाच घ्यायच नसत

खरंच, आयुष्यात सगळच आपल नसत.......


         


Rate this content
Log in