STORYMIRROR

Sarika BagalGade

Others

4  

Sarika BagalGade

Others

घेतला तिने स्त्री जन्म...

घेतला तिने स्त्री जन्म...

1 min
500

आनंदानी सर्वांना सुखावते

प्रत्येक गोष्ट ती निभावते

घेतला तिने स्त्री जन्म.........

    अंगावर झेलते दृष्टांचा प्रहार

     पण, क्षणात करते त्यांचा संहार

    किती प्रकारे नाते जपते

     पण, त्यातच ती होरपळते

    घेतला तिने स्त्री जन्म.......

होते जेव्हा भावाची बहिण

घराला येते खरे घरपण

प्रत्येक क्षेत्रात आज ती

काय सांगू तिची महती

घेतला तिने स्त्री जन्म.........

    अगाध तिची सहनशक्ती

     प्रत्येक घराची तीच तर पंती

    प्रेमाचा वसा तिच्या अंगी

    आई म्हणून ती प्रत्येकाच्या संगी

    घेतला तिने स्त्री जन्म..........

आयुष्यात तिच्या खडतर प्रवास

प्रत्येकाचा जिंकते ती विश्वास

पावलो पावली होतो छळ

पण, न हरण्याचे तिच्यात बळ

घेतला तिने स्त्री जन्म...........

     दुःखाचा झरा तिच्या काळजात

     पण, सुखानेच ठेवते तिच्या राज्यात

     आदिशक्ती हे तिचे रुद्रावतार

     दृष्टांवरच करते ती प्रहार

     घेतला तिने स्त्री जन्म...

प्रत्येक घराचा तीच तर आधार

कर्तव्यातून घेत नाही माघार

रंग व रूप तिचे अनेक

पण, सर्वांसाठी आहे ती एक

घेतला तिने स्त्री जन्म...


Rate this content
Log in