सद्यस्थिती : कोरोना आपत्ती
सद्यस्थिती : कोरोना आपत्ती
1 min
538
नवीन व्हायरस आलाय म्हणता नाव त्याचे कोरोना,
मात्र आता घरात बसून बसून मला काही करमेना.
सॅनिटायजर, मास्क सगळी काळजी घ्यायचीये मला स्वतः साठी,
कारण आयुष्यभर उभं रहायचंय मला माझा परिवाराच्या पाठी.
वाचाल तर वाचाल असं म्हणता
म्हणून पुस्तक उघडून बसतो,
तर कधी कधी स्वतःचं मनोरंजन मोबाईलमध्ये पण शोधतो.
खातो पितो झोपतो उठतो
कधी कधी बायकोला घरकामात मदतही करतो,
छोट्याश्या माझ्या परीला अलगद उचलून घेतो
रोज तिच्यासाठी आता मात्र मी घोडा बनतो.
आज ना उद्या कोरोनाची दहशत संपुष्टात येणार,
आणि सगळे आपापल्या कामात रमून जाणार.
त्यामुळे आजपासून परिवाराला वेळ द्या, स्वतःचे छंद जोपासा
बघा मग नंतर प्रत्येक क्षण कसा वाटेल जगावासा.