सांज
सांज
1 min
21.4K
ऊन्हे तांबुस झाली,
सांज अलवार आली !
झाले आकाश आरक्त,
दिसे गालावर लाली !!
सांज सोनेरी नाहली,
चंद्र भेटीला निघाली !
मंद चांदण्या संगती ,
सांज उगी बावरली !!
सांज दारी उतरली,
सूर आरतीचा कानी !
वात तेवते दिव्यांची,
भारावली अवघी धरणी !!
सांज अशी अवखळ,
जाई हळूच निघुन !
रात्रीचा गडद अंधार ,
सगळी कडे पसरून !!