STORYMIRROR

Bhagyashri Shinde

Others

3  

Bhagyashri Shinde

Others

रूसवा

रूसवा

1 min
406

पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा

सगळे झाले करून

तरीपण नद्या,नाले, आणि धरणे

काहो आहेत आ वासून


    झाली पूजा, झाले नवस ,

    झाले सगळे जप तप

    तरीपण का नाही होत पुरी

    या पाण्याची तलप


निसर्गच करतो, निसर्गच मारतो ,

निसर्गच काहीतरी चमत्कार करतो

तरी माणसा कारे तू

निसर्गाच्या विरोधात वागतो


   झाडे तोड, बांधकाम, नागरीकरण करून

   मर्यादा ओलांडतोस 

   आणि सुनामी,भूकंप, रोगराई आली की

   निसर्गाला कारणीभूत धरतोस


प्रदूषण , कचरा आणि भ्रष्टाचार

कसा करतोस वारंवार

अशाने वाईट आयुष्याला

तूच होशील जबाबदार  


    निसर्ग ,प्राणी आणि पक्षी

    नाहीत तुझे वैरी

    आता तरी जागा हो , सावर स्वतःला

    आणि कर निसर्गाशी मैत्री 

                  


Rate this content
Log in