ऋतुराज वसंत
ऋतुराज वसंत
1 min
382
येतो तो ज्या क्षणी
सुखद अनुभूती होतेे मनी
मंद धुंद फुलांचा सुवास
अवतीभवती फुलपाखरे ती खास
हळुवार मंद वाहणारे वारे
सोबतीला झाडांची पाने अन् फुले
पक्षांचा होणारा तो किलकिलाट
तांबड्या अन् पिवळ्या रंगांचा आभाळी तो लल्लाट
पिवळ्या पानांचे अलगद मातीत मिसळणे
अन् झाडांचे ते नव्याने अंकुरणे
ऊन सावलीचा तो लपंडाव
जसा मनी उमटतो आठवणींचा गाव
सप्तरंगांची उधळण चौफेर
जादूनगरीची जणू सफरच अखेर
येता क्षणी मन वेडावून जाणे
अन् जाताना मन भारावून येणे
सारी सृष्टी होते ज्याने तृप्त
असा हा ऋतूंचा राजा 'ऋतुराज वसंत'
